Join us  

CSK vs RCB Latest News : विराट कोहलीची बॅट तळपली, पण यष्टिंमागे महेंद्रसिंग धोनीनंही विक्रम नोंदवला

CSK vs RCB Latest News : . विराटनं 52 चेंडूंत 4 चौकार व 4 षटकार खेचून नाबाद 90 धावा कुटल्या. दुबे 14 चेंडूंत नाबाद 22 धावा केल्या. 

By स्वदेश घाणेकर | Published: October 10, 2020 10:08 PM

Open in App

Indian Premier League ( IPL 2020) चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings)च्या गोलंदाजांची विराट कोहलीनं ( Virat Kohli) धुलाई केली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) संघानं अखेरच्या 5 षटकांत 74 धावा चोपल्या. त्याच्या जोरावर RCBनं 4 बाद 169 धावा केल्या. या सामन्यात महेंद्रसिगं धोनीनंही ( MS Dhoni) विक्रमाला गवसणी घातली.

RCBचा कर्णधार विराट कोहली यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. आरोन फिंच हा माघारी परतल्यानंतर विराट कोहलीनं ( Virat Kohli) देवदत्त पडीक्कलसोबत अर्धशतकी भागीदारी केली. पण, शार्दूल ठाकूरनं ( Shardul Thakur) एकाच षटकात RCBला दोन धक्के दिले. पडीक्कल ( 33) पाठोपाठ एबी डिव्हिलियर्सलाही त्यानं शून्यावर माघारी पाठवले. पण, कोहली दुसऱ्या बाजूनं खिंड लढवत होता आणि त्यानं यासह विक्रमी कामगिरी केली. विराटनं आजच्या सामन्यात मोठा पराक्रम केला.  शिवम दुबे आणि विराट यांनी 76 धावांची भागीदारी करताना RCBला मोठा पल्ला गाठून दिला. विराटनं 52 चेंडूंत 4 चौकार व 4 षटकार खेचून नाबाद 90 धावा कुटल्या. दुबे 14 चेंडूंत नाबाद 22 धावा केल्या. 

IPLमध्ये सर्वाधिक झेल घेणाऱ्या यष्टिरक्षकाचा विक्रम धोनीनं नावावर केला. त्यानं आजच्या सामन्यात एबी डिव्हिलियर्स आणि वॉशिंग्टन सुंदर यांचे झेल टिपले. यासह त्याच्या नावावर आयपीएलमध्ये सर्वाधिक 106 झेल झाले आहेत. KKRचा कर्णधार दिनेश कार्तिक 104 झेलसह दुसऱ्या स्थानी आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी टिपणाऱ्या यष्टिरक्षकामध्ये धोनी 106 झेव ल 39 स्टम्पिंग अशा एकूण 145 बळींसह अव्वल स्थानावर आहे. कार्तिकच्या नावावर 134 बळी आहेत.  महेंद्रसिंग धोनी - 145*दिनेश कार्तिक - 134*रॉबिन उथप्पा - 90पार्थिव पटेल - 82वृद्धीमान सहा - 75      

टॅग्स :IPL 2020महेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्सदिनेश कार्तिकरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर