Indian Premier League ( IPL 2020) आजच्या दुसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings)नं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) विरुद्धच्या सामन्यात केदार जाधवला ( Kedar Jadhav) संघाबाहेर बसवलं. कोलकाता नाइट रायडर्स ( KKR) विरुद्धच्या मागील सामन्यात केदारला CSKला सोपा विजय मिळवून देता आला नाही. त्यात IPL 2020मधील त्याची कामगिरीही तितकी चांगली झालेली नाही. त्यामुळे त्याला हटवण्याची मागणी होतच होती आणि महेंद्रसिंग धोनीनं ( MS Dhoni) अखेर तो निर्णय घेतला. धोनीनं आजच्या सामन्यात स्फोटक फलंदाजाला संधी दिली. RCBचा कर्णधार विराट कोहली यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. केदारला 6 सामन्यांत 58 धावा करता आल्या आहेत.
Royal Challengers Bangalore XI: देवदत्त पडीक्कल, आरोन फिंच, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, गुरकिरत सिंग, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, इसुरू उडाना, ख्रिस मॉरिस, नवदीप सैनी, युजवेंद्र चहल.
Changes for RCB:IN: ख्रिस मॉरिस, गुरकिरत सिंग OUT: मोईन अली, मोहम्मद सिराज
Chennai Super Kings XI: शेन वॉटसन, फॅफ ड्यू प्लेसिस, अंबाती रायुडू, महेंद्रसिंग धोनी, सॅण कुरन, एऩ जगदीसन, रवींद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो, कर्ण शर्मा, शार्दूल ठाकूर, दीपक चहर
Changes for CSK:IN: एन जगदीसनOUT: केदार जाधव
कोण आहे नारायण जगदीसनतामीळनाडूच्या या फलंदाजानं TNPLमध्ये सर्वाधिक धावा चोपल्या आहेत.चेन्नई सुपर किंग्सने त्याला 2018मध्ये 20 लाखांत आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले.प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मध्य प्रदेशविरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात त्यानं 2016/17च्या मोसमात शतक झळकावलं होतं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यानं 23 सामन्यांत 4 शतकं व 4 अर्धशतकांसह 1174 धावा केल्या आहेतट्वेंटी-20त 22 सामन्यांत त्यानं 305 धावा केल्या आहेत.