Indian Premier League ( IPL 2020) चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings)च्या गोलंदाजांची विराट कोहलीनं ( Virat Kohli) धुलाई केली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) संघानं अखेरच्या 5 षटकांत 74 धावा चोपल्या. त्याच्या जोरावर RCBनं 4 बाद 169 धावा केल्या. केदार जाधवच्या जागी संघात स्थान मिळवलेल्या एन जगदीसननं सुरेख खेळ केला. अंबाती रायुडू खेळपट्टीवर तग धरून राहिला, परंतु त्याला CSKला विजय मिळवून देता आला नाही. महेंद्रसिंग धोनी चांगल्या सूरात वाटत होता, पण माशी शिंकली अन् धोनी बाद झाला. त्यानंतर CSKचा डाव गडगडला अन् RCBनं विजय मिळवून गुणतक्त्यात चौथ्या स्थानी झेप घेतली.
RCBचा कर्णधार विराट कोहली यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. आरोन फिंच हा माघारी परतल्यानंतर विराट कोहलीनं ( Virat Kohli) देवदत्त पडीक्कलसोबत अर्धशतकी भागीदारी केली. पण, शार्दूल ठाकूरनं ( Shardul Thakur) एकाच षटकात RCBला दोन धक्के दिले. पडीक्कल ( 33) पाठोपाठ एबी डिव्हिलियर्सलाही त्यानं शून्यावर माघारी पाठवले. पण, कोहली दुसऱ्या बाजूनं खिंड लढवत होता आणि त्यानं यासह विक्रमी कामगिरी केली. विराटनं आजच्या सामन्यात मोठा पराक्रम केला. शिवम दुबे आणि विराट यांनी 76 धावांची भागीदारी करताना RCBला मोठा पल्ला गाठून दिला. विराटनं 52 चेंडूंत 4 चौकार व 4 षटकार खेचून नाबाद 90 धावा कुटल्या. दुबे 14 चेंडूंत नाबाद 22 धावा केल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात निराशाजनक झाली. फॅफ ड्यू प्लेसिस आणि शेन वॉटसन हे दोघंही २५ धावांवर माघारी परतले. वॉशिंग्टन सुंदर यानं पुन्हा एकदा पॉवर प्लेमध्ये आपली ताकद दाखवली. त्यानं दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठवले. चेन्नईच्या फलंदाजांना त्यानं जखडून ठेवले होते. त्यामुळेच त्यांना पहिल्या दहा षटकांत ४५ धावा करता आल्या. पण, खेळपट्टीवर स्थिर झालेल्या अंबाती रायुडू ( Ambati Rayudu) आणि पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या नारायण जगदीसन ( Narayan Jagadeesan) यांनी तिसऱ्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी केली. जगदीसन ३३ धावांवर धावबाद झाला. महेंद्रसिंग धोनी आज फटकेबाजीच्या मुडमध्ये होता, परंतु युजवेंद्र चहलच्या लेग स्पीनवर सीमारेषेवर तो झेल देऊन माघारी परतला.
सॅम कुरनही ( ०) भोपळा न फोडताच बाद झाला. अंबाती रायुडूही ( ४२) धावांत माघारी गेला अन् चेन्नईचा पराभव पक्का झाला. RCBनं हा सामना 37 धावांनी जिंकला. IPL 2020त पहिलाच सामना खेळणाऱ्या ख्रिस मॉरिसनं 4 षटकांत 19 धावा देताना 3 विकेट्स घेतल्या. चेन्नईला 8 बाद 132 धावा करता आल्या.
Web Title: CSK vs RCB : Royal Challengers Bangalore beat Chennai Super Kings by 37 runs, go on fourth spot in IPL 2020 PointTable
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.