Join us  

CSK vs RR, IPL 2018 : वॉटसनचा शतकी धमाका; चेन्नई एक्सप्रेस अव्वल

राजस्थानच्या गोलंदाजीवर कडक फटकेबाजी करत वॉटसनने दमदार शतक झळकावले. त्याच्या शतकाच्या जोरावर चेन्नईने 204 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानचा डाव 140 धावांवर आटोपला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2018 7:41 PM

Open in App
ठळक मुद्देवॉटसनने आपल्या वादळापुढे राजस्थानच्या संघाला नमवले. वॉटसनने 57 चेंडूंत 9 चौकार आणि सहा षटाकारांच्या जोरावर 106 धावांची धडाकेबाज खेळी साकारली.

वॉटसनचा शतकी धमाका; चेन्नई एक्सप्रेस अव्वलपुणे : शेन वॉटसनच्या धमाकेदार शतकाच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने राजस्थान रॉयल्सवर 64 धावांनी सहज विजय मिळवला. शुक्रवारी झालेल्या आयपीएलच्या सामन्यात वॉटसनचे शतक लक्षवेधी ठरले. राजस्थानच्या गोलंदाजीवर कडक फटकेबाजी करत वॉटसनने दमदार शतक झळकावले. त्याच्या शतकाच्या जोरावर चेन्नईने 204 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानचा डाव 140 धावांवर आटोपला. या विजयासह चेन्नईने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे.

चेन्नईच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानची चांगली सुरुवात झाली नाही. त्यांनी आपले महत्वाचे तीन फलंदाजी फक्त 32 धावांत गमावले. त्यानंतर बेन स्टोक्सने एकाकी झुंज दिली. इम्रान ताहिरने स्टोक्सला बाद करत त्याची एकाकी झुंज संपुष्टात आणली. स्टोक्सने 37 चेंडूंत तीन चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 45 धावा केल्या. पण स्टोक्सचा अवपाद वगळता एकाही फलंदाजाला लौकिकाला साजेशी कामिगरी करता आली नाही. 

वॉटसनने दोनदा मिळालेल्या जीवदानाचा पुरेपूर फायदा उचलला. वॉटसनने आपल्या वादळापुढे राजस्थानच्या संघाला नमवले. वॉटसनने 57 चेंडूंत 9 चौकार आणि सहा षटाकारांच्या जोरावर 106 धावांची धडाकेबाज खेळी साकारली.

11.30 PM चेन्नईचा राजस्थानवर 64 धावांनी विजय

11.09 PM :  बेन स्टोक्सची एकाकी झुंज संपुष्टात

- राजस्थानचे फलंदाज एकामागून एक बाद होत असताना बेन स्टोक्सने एकाकी झुंज दिली. इम्रान ताहिरने स्टोक्सला बाद करत त्याची एकाकी झुंज संपुष्टात आणली. स्टोक्सने 45 धावा केल्या.

10.59 PM : राजस्थानला पाचवा धक्का; राहुल त्रिपाठी बाद

- ब्राव्होने बटलरनंतर राहुल त्रिपाठीलाही तंबूत धाडले. राहुलला पाच धावा करता आल्या.

10.49 PM : राजस्थानला चौथा धक्का; जोस बटलर बाद

- ब्राव्होने आपल्या पहिल्याच चेंडूवर जोस बटलरला बाद करत राजस्थानला चौथा धक्का दिला. बटलरने 17 चेंडूंत 22 धावा केल्या.

10.45 PM : राजस्थान दहा षटकांत 3 बाद 77

10.20PM : राजस्थानला तिसरा धक्का, अजिंक्य रहाणे बाद    राजस्थानचा कर्णधार अजिंक्य रहाणे १६ धावा काढून बाद, दीपक चहरने उडवला रहाणेचा त्रिफळा 10.12PM : संजू सॅमसन बाद, राजस्थानची दुसरी विकेट10.03 PM : राजस्थानला पहिला धक्का, शार्दुल ठाकूरने काढली क्लासेनची विकेट9.57 PM :  रहाणेचा राजस्थानसाठी पहिला षटकार

9.55 PM : हेन्रीच क्लासीनला शून्यावर जीवदान

पुणे : शेन वॉटसनच्या शतकी झंझावाताच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात 204 धावांचा डोंगर उभारला. यंदाच्या आयपीएलमधले हे दुसरे शतक ठरले.

वॉटसनने दोनदा मिळालेल्या जीवदानाचा पुरेपूर फायदा उचलला. गोलंदाजीवर कडक प्रहार करत वॉटसनने आपल्या वादळापुढे राजस्थानच्या संघाला नमवले. वॉटसनने 57 चेंडूंत 9 चौकार आणि सहा षटाकारांच्या जोरावर 106 धावांची धडाकेबाज खेळी साकारली.

 

वॉटसनला कसे मिळाले जीवदान

पहिल्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर वॉटसनला पहिले जीवदान मिळाले. स्टुअर्ट बिन्नीच्या गोलंदाजीवर राहुल त्रिपाठीने वॉटसन आठ धावांवर असताना त्याचा झेल सोडला. दुसऱ्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर पुन्हा एकदा वॉटसनला जीवदान मिळाले. त्रिपाठीनेच दुसऱ्यांदा त्याचा झेल सोडला, त्यावेळी वॉटसन 18 धावांवर होता.

 

9.36 PM :  चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान

9.35 PM : शतकवीर शेन वॉटसन OUT

- वॉटसनने आपल्या दणकेबाज फटक्यांनी 106 धावांची खेळी साकारली.

9.34  PM : चेन्नईच्या दोनशे धावा पूर्ण

9.29 PM : वॉटसनची आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या (105)

- वॉटसनने यापूर्वी 2015 साली नाबाद 104 धावांची खेळी साकारली होती. या सामन्यात वॉटसनने आपली सर्वोच्च धावसंख्या नोंदवली.

9.19 PM : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक

- वॉटसनने यंदाच्या हंगामातील ख्रिस गेलनंतर दुसरे शतक झळकावले. वॉटसनने तुफानी फटकेबाजी करत 51 चेंडूंत 9 चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर आपले शतक पूर्ण केले. वॉटसनचे आयपीएलमधील हे तिसरे शतक ठरले. यापूर्वी 2013 आणि 2015 साली वॉटसनने शतक झळकावले होते.

9.12 PM :  बिलिंग्स OUT; चेन्नईला चौथा धक्का

- श्रेयस गोपालने रैना, धोनी यांच्या पाठोपाट सॅम बिलिंग्सचाही काटा काढला. बिलिंग्सला त्याने बेन स्टोक्सकरवी तीन धावांवर बाद केले.

9.04 PM : धोनी OUT; चेन्नईला मोठा धक्का

- पुन्हा एकदा अप्रतिम झेल पकडत कृष्णप्पा गौतमने चेन्नईला मोठा धक्का दिला. गौतमने यावेळी धोनीचा उत्कृष्ट झेल टिपला. धोनीला तीन चेंडूंत पाच धावा करता आल्या.

8.59 PM : चेन्नईचे 13 षटकांत दीडशतक साजरे

8.50 PM : सुरेश रैना OUT, चेन्नईला दुसरा धक्का

- रैनाने जोरदार फटकेबाजी करत झोकात पुनरागमन केले. पण यावेळी त्याचे अर्धशतक फक्त चार धावांनी हुकले. रैनाने 29 चेंडूंत 9 चैकारांच्या जोरावर 46 धावा केल्या. रैनाचा अप्रतिम झेल यावेळी कृष्णप्पा गौतमने पकडला.

8.42 PM : चेन्नई दहा षटकांत 1 बाद 107

8.38 PM : नवव्या षटकात दोन षटकारांसह चेन्नईची 19 धावांची लूट

- नवव्या षटकात वॉटसनने षटकाराने आपले अर्धशतक पूर्ण केले, त्यानंतर त्याने अजून एक षटकार आणि चौकार लगावला. या षटकात चेन्नईने 19 धावांची लूट केली.

8.35 PM : षटकारासह वॉटसनचे दमदार अर्धशतक

- चेन्नईचा सलामीवीर शेन वॉटसनने धडाकेबाज फलंदाजी करत 28 चेंडूंत दणक्यात अर्धशतक पूर्ण केले.

8.25 PM : सुरेश रैनाचा चौकारांचा चौकार

- दुखापतीनंतर संघात परतलेल्या सुरेश रैनाने बेन स्टोक्सच्या सहाव्या षटकात सलग चार चौकार लगावले.

8.24 PM : सुरेश रैनाचे सलग दोन चौकार

8.20 PM : चेन्नई पाच षटकांत 1 बाद 53

8.18 PM : चेन्नईला पहिला धक्का; अंबाती रायुडू OUT

- बेन लॉघलिनने चेन्नईचा सलामीवीर अंबाती रायुडूला बाद केले. रायुडूने 8 चेंडूंत 12 धावा केल्या.

8.11 PM : वॉटसनचे एकाच षटकात दोन षटकार

- जयदेव उनाडकटच्या तिसऱ्या षटकात वॉटसनने दोन षटकार लगावले आणि आपल्याला दोनदा जीवदान मिळाल्याचा चांगलाच फायदा उचलला.

8.07 PM : वॉटसनला दुसऱ्यांदा जीवदान

- षटकार लगावल्यावर दुसऱ्या चेंडूच्या अखेरच्या चेंडूवर पुन्हा एकदा वॉटसनला जीवदान मिळाले. त्रिपाठीनेच दुसऱ्यांदा त्याचा झेल सोडला.

8.06 PM : SIX...शेन वॉटसन तळपला; संघासाठी फटकावला पहिला षटकार

- जीवदानाचा चांगलाच फायदा यावेळी वॉटसनने उचलला. दुसऱ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर त्याने संघासाठी पहिला षटकार लगावला.

8.03 PM : शेन वॉटसनला पहिल्याच षटकात जीवदान

- पहिल्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर वॉटसनला जीवदान मिळाले. स्टुअर्ट बिन्नीच्या गोलंदाजीवर राहुल त्रिपाठीने वॉटसन आठ धावांवर असताना त्याचा झेल सोडला.

8.00 PM : पहिल्याच चेंडूवर चैकारानिशी चेन्नईची दणक्यात सुरुवात

- स्टुअर्ट बिन्नीकडून पहिलाच चेंडू नो बॉल पडला. त्यानंतरच्या फ्री-हिटवर वॉटसनने चैकार लगावत संघाला धमाकेदार सुरुवात करून दिली.

धोनी आणि रैना दोघेही या सामन्यात खेळणार

पाठिच्या दुखण्यामुळे चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात खेळणार नाही, असे म्हटले जात होते. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धोनी या सामन्यात खेळणार आहे. पण जायबंदी सुरेश रैना या सामन्यात खेळणार की नाही, याबाबत संदिग्धता होती. पण रैनादेखील या सामन्यात खेळणार आहे, अशी माहिती धोनीने दिली.

 

7.30 PM : राजस्थानने नाणेफेक  जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला

 

 

पाहा चेन्नई आणि राजस्थान यांच्यातील सामन्याचे विश्लेषण

 

पुण्यात विजयी धाव घेण्यासाठी चेन्नई एक्सप्रेस सज्ज; राजस्थानविरुद्ध सामनापुणे : चेन्नई सुपर किंग्जचा शुक्रवारी पहिला सामना रंगणार आहे पुण्यामध्ये. कावेरी पाणी वाटपाचा मुद्दा चिघळल्यानंतर चेन्नईचे सर्व सामने पुण्याला हलवण्यात आले आहेत. चेन्नईच्या चाहत्यांनीही आपल्या लाडक्या खेळाडूंना पाहण्यासाठी पुणे गाठले आहे. पुण्याच्या पहिल्या सामन्यात चेन्नईचा संघ विजय मिळवणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल. चेन्नई हा सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणार आहे. या सामन्यात चेन्नईचा संघ विजय मिळवून दुसरे स्थान पटकावतो की राजस्थान विजयानिशी चौथे स्थान पटकावते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

 

दोन्ही संघ 

 

 

पुण्याचे मैदान पहिल्या सामन्यासाठी सज्ज

 

टॅग्स :आयपीएल 2018चेन्नई सुपर किंग्सराजस्थान रॉयल्स