CSK vs RR, IPL 2023: MS धोनी आज मैदानात उतरताच IPLमध्ये इतिहास रचणार; चेन्नईविरुद्ध राजस्थानचा रंगणार सामना

CSK vs RR: राजस्थान विरुद्धचा सामना चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी यासाठी मोठा असणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 01:05 PM2023-04-12T13:05:47+5:302023-04-12T13:06:07+5:30

whatsapp join usJoin us
CSK vs RR, IPL 2023: MS Dhoni in his 200th match as Chennai captain in IPL | CSK vs RR, IPL 2023: MS धोनी आज मैदानात उतरताच IPLमध्ये इतिहास रचणार; चेन्नईविरुद्ध राजस्थानचा रंगणार सामना

CSK vs RR, IPL 2023: MS धोनी आज मैदानात उतरताच IPLमध्ये इतिहास रचणार; चेन्नईविरुद्ध राजस्थानचा रंगणार सामना

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आज आमनेसामने येणार असून दोन्ही संघांचे लय राखण्याचे लक्ष्य असेल. चेन्नई आणि राजस्थान संघ हे यंदाच्या जेतेपदासाठी प्रबळ दावेदार म्हणून ओळखले जात आहे.

राजस्थान विरुद्धचा सामना चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी यासाठी मोठा असणार आहे. आजचा दिवसही धोनीसाठी महत्वाचा असणार आहे. कारण धोनी चेन्नईचा कर्णधार म्हणून आज २०० वा सामना खेळणार आहे. हा एक मोठा रेकॉर्ड असणार आहे. धोनी पहिला खेळाडू असणार आहे, की जो आयपीएलच्या इतिहासात एकाच संघाचा कर्णधार म्हणून २००वा सामना खेळणार आहे. धोनीनंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माचा नंबर लागतो. त्याने मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून एकूण १४६ सामने खेळले आहे.

चेन्नई विरुद्ध राजस्थानचा हा सामना चेन्नई येथील एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. या मैदानाची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी अनुकूल मानली जाते. सामना जसजसा पुढे जातो, तसतशी फलंदाजी करणे अवघड होते. चेन्नईकडे रवींद्र जडेजा, मिचेल सँटनर आणि मोईन अली यांसारखे, तर राजस्थानकडे रविचंद्रन अश्विन आणि यजुवेंद्र चहल यांसारखे दर्जेदार फिरकीपटू आहेत.

दरम्यान, प्रत्येकी दोन अर्धशतकी खेळी करणारे राजस्थान रॉयल्सचे सलामीवीर जोस बटलर आणि यशस्वी जैस्वाल यांची चेन्नई सुपरकिंग्सचा बालेकिल्ला असलेल्या चेपॉक मैदानावर त्यांच्या फिरकी गोलंदाजांविरुद्ध कठोर परीक्षा असेल. चेन्नईची खेळपट्टी फिरकीला पूरक मानली जाते. नाणेफेक निर्णायक ठरेल. येथे १७०- १७५ धावांचे लक्ष्य गाठणे सोपे नसते.

Web Title: CSK vs RR, IPL 2023: MS Dhoni in his 200th match as Chennai captain in IPL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.