Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वात चेन्नई सुपर किंग्सच्या ( Chennai Super Kings) बाबतीत अनपेक्षित निकाल पाहायला मिळाला. IPL च्या प्रत्येक पर्वात Play Off पर्यंत मजल मारणाऱ्या CSKला प्रथमच अपयश पचवावे लागले. राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) आणि CSK या दोन्ही संघांसाठी आजचा सामना अत्यंत महत्त्वाचा होता. त्यामुळे सामना चुरशीचा होईल, अशी सर्वांना अपेक्षा होती. पण, धोनीच्या संघातील महारथींनी आज पाट्या टाकल्या आणि एकतर्फी झालेल्या सामन्यात RRनं बाजी मारून प्ले ऑफच्या शर्यतीत स्वतःला कायम राखले. या पराभवानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण यानं ट्विट करून पुन्हा एकदा महेंद्रसिंग धोनीला ( MS Dhoni) चिमटा काढला.
चेन्नई सुपर किंग्सला या पराभवानंतर १० सामन्यांत ७ पराभवासह तळाला समाधान मानावे लागले आहे. आजच्या निकालानं त्यांना प्ले ऑफच्या शर्यतीतूनही जवळपास बाहेर फेकले आहे. राजस्थान रॉयल्सनं १० सामन्यांत ४ विजयासह ८ गुणांची कमाई करत आव्हान कायम राखले आहे. फॅफ ड्यू प्लेसिसला ( १०) माघारी जावं लागले. शेन वॉटसन ( ८), अंबाती रायुडू ( १३) आणि सॅम कुरन ( २२) माघारी परतले. कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि रवींद्र जडेजा यांनी पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. पण, राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांच्या टिच्चून माऱ्यासमोर त्या दोघांना धावा घेताना चाचपडावे लागले. १८व्या षटकात २८ धावांवर धोनी धावबाद झाला. चेन्नईला २० षटकांत ५ बाद १२५ धावा करता आल्या. जडेजा ३५ धावांवर नाबाद राहिला.
प्रत्युत्तरात राजस्थानची सुरुवातही निराशाजनक झाली. बेन स्टोक्स (१९), रॉबीन उथप्पा ( ४) आणि संजू सॅमसन ( ०) यांना लगेच माघारी जावे लागले. महेंद्रसिंग धोनीनं पाचव्या षटकात दीपक चहरच्या गोलंदाजीवर घेतलेला झेल पाहून सारेच थक्क झाले. RRचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि जोस बटलर यांनी CSKच्या गोलंदाजांचा सामना करताना गाडी रुळावर आणली. धोनीनं पहिल्या दहा षटकांत दीपक चहर ( २/१८) व जोश हेझलवूड ( १/१९) यांचे प्रत्येकी चार षटक वापरली. बटलर व स्मिथ यांनी अर्धशतकी भागीदारी करताना राजस्थानला विजयी मार्गावर ठेवले. बटलरने ३७ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. दुसऱ्या बाजूनं स्मिथ संयमी खेळ करत होता. त्यानं नाबाद २५ धावा केल्या. बटलर ४८ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ७० धावांवर नाबाद राहिला. राजस्थाननं १७.३ षटकांत ३ फलंदाजांच्या मोबदल्यात १२६ धावा करून विजय पक्का केला.
महेंद्रसिंग धोनीचा हा २०० वा IPL सामना होता आणि दोनशे सामने खेळणारा तो पहिलाच खेळाडू ठरला. यावेळी नाणेफेक करताना धोनीला विचारले असता तो म्हणाला की,''तुम्ही सांगितल्यानंतर मला हे माहीत झाले. हा फक्त आकडा आहे (It's just a number). इतके सामने खेळण्याची संधी मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो.''
सामन्यातील पराभवानंतर इरफान पठाणनं ट्विट केले आणि त्यात त्यानं It's just a number या धोनीच्या विधानाचा समाचार घेतला. ''विजय हा फक्त आकडा आहे आणि राजस्थान रॉयल्ससाठी तो आकडा म्हणजे दोन आहे,''असे पठाणनं ट्विट केलं.
याआधीही धोनीच्या संथ खेळीवरून इरफाननं ट्विट केलं होतं की,''काही लोकांसाठी वय हे केवळ नंबर आहे आणि काहींसाठी संघातून हकालपट्की करण्याचं कारण.''
Web Title: CSK vs RR : Irfan Pathan ones again troll MS Dhoni on 'Just a number' remark, tweet go viral
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.