Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वात Play Offच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) आणि राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) यांच्यासाठी आजचा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांनी प्ले ऑफमध्ये आपले स्थान जवळपास पक्के केले आहे. चौथ्या स्थानासाठी कोलकाता नाईट रायडर्स आघाडीवर असले तरी अन्य संघांनाही समान संधी आहे. त्यामुळे या शर्यतीतून बाद होण्यासाठी एक पराभवही पुरेसा आहे. CSK vs RR या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रथम फलंदाजीला आलेल्या फॅफ ड्यू प्लेसिस आणि सॅम कुरन यांना मोठे फटके मारण्यापासून राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी रोखले. जोफ्रा आर्चरनं पुन्हा भेदक मारा करताना प्रतिस्पर्धी फलंदाजांना जखडून ठेवले. त्याचे फळ तिसऱ्या षटकात मिळाले. आर्चरच्या बाऊंसरवर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं फटका मारणाऱ्या फॅफ ड्यू प्लेसिसला माघारी जावं लागले. आज क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत असलेल्या जोस बटलरनं हवेत झेपावत सुरेख झेल टिपला. फॅफ १० धावांवर माघारी परतला. कार्तिक त्यागीचे पहिल्याच षटकात तीन चौकाराने स्वागत झाले, परंतु षटकाच्या अखेरच्या चेंडूवर त्यानं शेन वॉटसनला ( ८) माघारी पाठवून CSKला मोठा धक्का दिला.
त्यानंतर आलेल्या अंबाती रायुडूनं ( Ambati Rayudu) स्वतःचं नाव एका वेगळ्या पंक्तीत नोंदवले. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये ५००० धावा करणारा तो ११वा भारतीय फलंदाज ठरला.
ट्वेंटी-20 त सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाजविराट कोहली - ९२४७रोहित शर्मा- ८९०२सुरेश रैना - ८३९२शिखर धवन - ७६५३महेंद्रसिंग धोनी - ६७५७रॉबीन उथप्पा - ६६२८गौतम गंभीर - ६४०२दिनेश कार्तिक - ५८४९मनीष पांडे - ५५३६अजिंक्य रहाणे - ५०१३अंबाती रायुडू - ५०००*
Chennai Super Kings XI: सॅम कुरन, फॅफ ड्यू प्लेसिस, शेन वॉटसन, अंबाती रायुडू, महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, केदार जाधव, जोश हेझलवूड, पीयूष चावला, दीपक चहर, शार्दूल ठाकूर
Rajasthan Royals XI: रॉबीन उथप्पा, बेन स्टोक्स, संजू सॅमसन, स्टीव्ह स्मिथ, जोस बटलर, रियान पराग, राहुल टेवाटिया, जोफ्रा आर्चर, अंकित राजपूत, कार्तिक त्यागी