CSK vs RR Latest News : संजू सॅमसन, स्टीव्ह स्मिथ अन् जोफ्रा आर्चरच वादळ घोंगावलं, CSKचे सर्व डावपेच फसले

CSK vs RR Latest News :जोफ्रा आर्चरने ( Jofra Archer) ने 20 व्या षटकात लुंगी एनगिडीच्या गोलंदाजीवर 30 धावा चोपल्या. 

By स्वदेश घाणेकर | Published: September 22, 2020 09:28 PM2020-09-22T21:28:06+5:302020-09-22T21:34:05+5:30

whatsapp join usJoin us
CSK vs RR Latest News : Jofra Archer (27* off 8) smashes 4 sixes in the final over by Lungi Ngidi, Rajasthan Royals post 216/7 | CSK vs RR Latest News : संजू सॅमसन, स्टीव्ह स्मिथ अन् जोफ्रा आर्चरच वादळ घोंगावलं, CSKचे सर्व डावपेच फसले

CSK vs RR Latest News : संजू सॅमसन, स्टीव्ह स्मिथ अन् जोफ्रा आर्चरच वादळ घोंगावलं, CSKचे सर्व डावपेच फसले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देसॅमसननं 32 चेंडूंत 1 चौकार व 9 षटकारासह 74 धावा केल्यास्टीव्ह स्मिथ 47 चेंडूंत 4 चौकार व 4 षटकार खेचून 69 धावांवर माघारी आर्चरने 8 चेंडूंत 4 षटकार खेचून नाबाद 27 धावा केल्या

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( Indian Premier League) आज चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) आणि राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) यांच्यातल्या सामन्यात संजू सॅमसन ( Sanju Samson) आणि स्टीव्ह स्मिथ ( Steven Smith) यांच्या वादळी खेळीनं सर्वांना मंत्रमुग्ध केलं. जोस बटलरच्या अनुपस्थितीत स्मिथनं सलामीला येण्याचा घेतलेला निर्णय सर्वांना आवडला. त्याला सॅमसनने जबरदस्त साथ दिली. पण, सॅमसन बाद झाल्यानंतर टप्प्याटप्य्यानं RRच्या विकेट्स पडल्या. जोफ्रा आर्चरने ( Jofra Archer) ने 20 व्या षटकात लुंगी एनगिडीच्या गोलंदाजीवर 30 धावा चोपल्या. CSK vs RR Live Score & Updates 

महेंद्रसिंग धोनीचा पारा चढला, थेट अम्पायरशी भिडला; जाणून घ्या नक्की काय झालं 

अंबाती रायुडू अनफिट असल्यानं त्याच्या जागी ऋतुराज गायकवाडला संधी दिली आहे. महेंद्रसिंग धोनीनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. अनुभवी खेळाडूच्या अनुपस्थितीत RRचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ यानं सलामीला येण्याचा निर्णय घेतला. त्याच्यासोबत युवा फलंदाज यशस्वी जैस्वालनं IPLमध्ये पदार्पण केले, परंतु त्याला तिसऱ्याच षटकात दीपक चहरने माघारी पाठवले. तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर चहरच्या बाऊंसरवर फटका मारण्याच्या प्रयत्नात चेंडू जागच्या जागी हवेत उडाला, चहरने तो सहज टिपला. स्मिथ आणि संजू सॅमसन ( Sanju Samson ) यांनी RRचा डाव सावरला. सॅमसननं पीयूष चावला ( Piyush Chawla) याच्या एका षटकात 28 धावा चोपून काढताना 19 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. स्टीव्ह स्मिथनेही दुसऱ्या बाजूने दमदार फटकेबाजी केली. त्याच्या फटकेबाजीच्या जोरावर RRने दहा षटकांत 1 बाद 119 धावांची मजल मारली. CSK vs RR Live Score & Updates 

12व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर सॅमसनचा झंझावात लुंगी एनगिडीनं रोखला. त्याच्या गोलंदाजीवर दीपक चहरनं झेल टिपला. सॅमसननं 32 चेंडूंत 1 चौकार  व  9 षटकारासह 74 धावा केल्या. सॅमसननं आजच्या खेळीसह विक्रमाला गवसणी घातली. IPLमध्ये दोन सामन्यांत 9+ षटकार खेचणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला. त्यानं 2018मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 10 षटकार खेचले होते. त्याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर डेवीड मिलर ( David Miller) धावबाद झाला. रॉबीन उथप्पाही लगेच माघारी परतला. दरम्यान, स्मिथनंही त्याचे अर्धशतक पूर्ण केले. पण, RRचे विकेट पडण्याचे सत्र सुरू राहिले. राहुल टेवटीया व रियान पराग एकाच षटकात माघारी परतले. त्यामुळे RRच्या धावगतीला ब्रेक लागला. CSK vs RR Live Score & Updates 

18व्या षटकाच्या दीपक चहरने टाकलेल्या 5व्या चेंडूवर टॉम कुरनला पंचांनी बाद असल्याचा निर्णय दिला. चेंडू बॅटला लागून यष्टीमागे धोनीनं झेलल्याचे वाटल्यामुळे पंचांनी कुरनला बाद दिले. पण, पंचांच्या या निर्णयावर कुरन नाराज झाला. RRकडे DRS शिल्लक नसल्यानं त्याला दाद मागता आली नाही. तो पॅव्हिलयनकडे जात असताना रिप्लेत नाबाद असल्याचे दिसले आणि तो मैदानावरच थांबला. त्यानंतर पंचांनी तिसऱ्या पंचाकडे दाद मागितली आणि या निर्णयावरून MS Dhoni भडकला. त्यानं स्पष्ट शब्दात पंचांना सुनावलं. तिसऱ्या पंचांना कुरनला नाबाद दिले. त्यानंतर स्टीव्ह स्मिथ 47 चेंडूंत 4 चौकार व 4 षटकार खेचून 69 धावांवर माघारी परतला. 



RRला निर्धारित षटकात 7 बाद 216 धावा चोपल्या. आर्चरने 8 चेंडूंत 4 षटकार खेचून नाबाद 27 धावा केल्या. एनगिडीनं अखेरच्या षटकात दोन नो बॉल व एक व्हाईड ब़ॉलही टाकला. 

Web Title: CSK vs RR Latest News : Jofra Archer (27* off 8) smashes 4 sixes in the final over by Lungi Ngidi, Rajasthan Royals post 216/7

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.