ठळक मुद्देचेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी फलंदाजीस उतरला तेव्हा सामना चेन्रई सुपरकिंग्सच्या हातातून जवळपास निसटला होताअखेरच्या षटकामध्ये चेन्नईला विजासाठी ३८ धावांची गरज असताना धोनीने या षटकातील तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर सलग तीन षटकार ठोकलेयापैकी एक षटकार एवढा उत्तुंग होता की, तो थेट स्टेडियमबाहेर जात रस्तावर पडला
शारजा - आयपीएलमध्ये काल झालेल्या लढतीत राजस्थान रॉयल्सनेचेन्नई सुपर किंग्सवर मात केली. षटकार-चौकारांची बरसात आणि धावांचा पाऊस पडलेल्या या लढतीत चेन्नई सुपरकिंग्सला विजयासाठी १६ धावा कमी पडल्या. या लढतीत चेन्नई सुपरकिंग्सचा पराभव झाला असला तरी शेवटच्या षटकांमध्ये कर्णधार महेंद्रसिंह धोनीने केलेली तुफानी फटकेबाजी चर्चेचा विषय ठरली आहे.
चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी फलंदाजीस उतरला तेव्हा सामना चेन्रई सुपरकिंग्सच्या हातातून जवळपास निसटला होता. दरम्यान अखेरच्या षटकामध्ये चेन्नईला विजासाठी ३८ धावांची गरज असताना धोनीने या षटकातील तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर सलग तीन षटकार ठोकले. यापैकी एक षटकार एवढा उत्तुंग होता की, तो थेट स्टेडियमबाहेर जात रस्तावर पडला.
धोनीचा हा जबरदस्त फटका कॅमेरामनने आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपला. त्यामध्ये जे दृश्य दिसले ते आश्चर्याचा धक्का देणारे होते. धोनीने मारलेला हा षटकार स्टेडियमच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर पडला. तेवढ्यात एक माणूस तिथे आला. त्याने हसत हसत हा चेंडू उचलून, एक मौल्यवान वस्तू सापडल्याच्या आनंदात हा चेंडू आपल्यासोबत नेला. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यामध्ये टिपला गेला आहे.
दरम्यान, या लढतीत धोनी जेव्हा फलंदाजीसाठी आला होता तेव्हा चेन्नईला विजयासाठी ३८ चेंडून १०३ धावांची गरज होती. त्यानंतर फाफ डू प्लेसिस आणि धोनीने आक्रमक फलंदाजी केली. धोनीने अखेरच्या षटकामध्ये तर सलग तीन षटकार ठोकले पण चेन्नईला निर्धारित २० षटकांमध्ये २०० धावांपर्यंतच मजल मारता आली. धोनी १७ चेंडूत २९ धावा काढून नाबाद राहिला.
राजस्थानचा चेन्नईवर 'रॉयल' विजयसलामीला मुंबई इंडियन्सला नमवून दिमाखात सुरुवात केलेल्या चेन्नईची हवा राजस्थानने काढली. राहुल तेवटीयाने ३ बळी घेत चेन्नईचे कंबरडे मोडले. जोफ्रा आर्चरने वादळी फटकेबाजीनंतर टिच्चून गोलंदाजी करत चेन्नईला फटकेबाजीपासून दूर ठेवले. फाफ डूप्लेसिसने ३७ चेंडूत ७२ धावांची झंझावाती खेळी करत चेन्नईच्या आशा कायम ठेवल्या होत्या. कर्णधार
महेंद्रसिंग धोनीने अखेरच्या षटकांत टॉम कुरणला ठोकलेले सलग तीन षटकारही चेन्नईचा पराभव टाळू शकले नाही.
तत्पूर्वी, संजू सॅमसन, कर्णधार स्टीव्ह स्मिथ व आर्चर यांच्या तुफानी खेळीच्या जोरावर राजस्थानने धावांचा एव्हरेस्ट उभारला. सॅमसन आणि स्मिथ यांनी दमदार अर्धशतकांसह राजस्थानला आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत पोहचवले. परंतु, आर्चरने २०व्या षटकात लुंगी एनगिडीला सलग चार षटकार ठोकले. यातील दोन चेंडू नो बॉल होते. त्यामुळे राजस्थानला एकप्रकारे लॉटरीच लागली. सॅम कुरनने ३ बळी घेत राजस्थानला रोखण्याचा प्रयत्न केला. राजस्थाने तब्बल १७ षटकार ठोकले. यापैकी ९ षटकार एकट्या सॅमसनने, तर स्मिथ व आर्चर यांनी प्रत्येकी ४ षटकार ठोकले.
Web Title: CSK vs RR Latest News: MS Dhoni's Big hits, the ball went straight out of the stadium, and ...
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.