इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( Indian Premier League) आज चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) आणि राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) यांच्यात सामना सुरू आहे. या सामन्यात MS Dhoni आणि Steven Smith हे जगातील दोन सर्वोत्तम कर्णधारांचे नेतृत्व कौशल्य आज पाहायला मिळणार. बेन स्टोक्स आणि जोस बटलर यांच्या उपस्थितीत RR आज युवा खेळाडूंना संधी दिली. CSK ने संघात एक बदल केला आहे. अंबाती रायुडू अनफिट असल्यानं त्याच्या जागी ऋतुराज गायकवाडला संधी दिली आहे. महेंद्रसिंग धोनीनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. CSK vs RR Live Score & Updates
यशस्वी जैस्वाल जेव्हा MS Dhoni ला भेटला, सामन्यापूर्वी त्यानं जे केलं ते पाहाच
'पाणीपुरी'वाल्या पोराची 'रॉयल' भरारी; मुंबईकर फलंदाजाचे RRकडून पदार्पण
अनुभवी खेळाडूच्या अनुपस्थितीत RRचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ यानं सलामीला येण्याचा निर्णय घेतला. त्याच्यासोबत युवा फलंदाज यशस्वी जैस्वालनं IPLमध्ये पदार्पण केले, परंतु त्याला तिसऱ्याच षटकात दीपक चहरने माघारी पाठवले. तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर चहरच्या बाऊंसरवर फटका मारण्याच्या प्रयत्नात चेंडू जागच्या जागी हवेत उडाला, चहरने तो सहज टिपला. स्मिथ आणि संजू सॅमसन ( Sanju Samson ) यांनी RRचा डाव सावरला. Samsonनं पीयूष चावला ( Piyush Chawla) याच्या एका षटकात 28 धावा चोपून काढताना 19 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. स्टीव्ह स्मिथनेही दुसऱ्या बाजूने दमदार फटकेबाजी केली. त्याच्या फटकेबाजीच्या जोरावर RRने दहा षटकांत 1 बाद 119 धावांची मजल मारली. CSK vs RR Live Score & Updates
12व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर सॅमसनचा झंझावात लुंगी एनगिडीनं रोखला. त्याच्या गोलंदाजीवर दीपक चहरनं झेल टिपला. सॅमसननं 32 चेंडूंत 1 चौकार व 9 षटकारासह 74 धावा केल्या. त्याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर डेवीड मिलर ( David Miller) धावबाद झाला. सॅमसननं आजच्या खेळीसह विक्रमाला गवसणी घातली. IPLमध्ये दोन सामन्यांत 9+ षटकार खेचणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला. त्यानं 2018मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 10 षटकार खेचले होते. CSK vs RR Live Score & Updates