Join us  

CSK vs RR Latest News : महेंद्रसिंग धोनी आज इतिहास रचणार; IPLमध्ये अनोखं द्विशतक झळकावणार!

Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वात Play Offच्या शर्यतीत मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांचे स्थान निश्चित मानले जात आहे. चेन्नई सुपर किंग्सने ( Chennai Super Kings) आणि राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) यांना शनिवारी पराभवाचा धक्का सहन करावा लागला.

By स्वदेश घाणेकर | Published: October 19, 2020 3:50 PM

Open in App

Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वात Play Offच्या शर्यतीत मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांचे स्थान निश्चित मानले जात आहे. चेन्नई सुपर किंग्सने ( Chennai Super Kings) आणि राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) यांना शनिवारी पराभवाचा धक्का सहन करावा लागला. त्यामुळे त्यांचे Play Offच्या आशा मावळतीच्या दिशेनं झुकू लागल्या आहेत. आज CSK आणि RR यांच्यात सामना होणार आहे आणि पराभूत संघ प्ले ऑफ शर्यतीतून बाद होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ सर्वस्व पणाला लावून आज मैदानावर उतरणार आहेतय CSK आणि RR यांना ९ सामन्यांत ३ विजय मिळवता आले आहेत आणि त्यांना ६ पराभव पत्करावे लागले आहेत. त्यांच्या खात्यात प्रत्येकी ६ गुण आहेत. आजच्या सामन्यात मैदानावर पाऊल ठेवताच CSK चा कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) इतिहास रचणार आहे.

चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्या वाट्यातील पाच सामने अजूनही शिल्लक आहेत. या दोघांनाही Play Offमध्ये प्रवेश करण्यासाठी पाचही सामने जिंकावे लागतील. तर त्यांना १० गुणांची कमाई करता येईल आणि आधीच्या ६ गुणांसह एकूण १६ गुणांची कमाई करून ते प्ले ऑफमध्ये प्रवेश करू शकतील. पण, यापैकी केवळ एकच संघ प्ले ऑफमध्ये प्रवेश निश्चित करू शकतो. त्यामुळे चेन्नई - राजस्थान यांच्या सामन्यावर दोघांचेही भवितव्य अवलंबून आहे. 

महेंद्रसिंग धोनी आज २००वा आयपीएल सामना खेळणार आहे. आयपीएलच्या इतिहासात २०० सामने खेळणारा धोनी हा पहिलाच खेळाडू आहे. त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं तीन वेळा आयपीएल जेतेपद पटकावली आहेत.

महेंद्रसिंग धोनीची आयपीएलमधील कामगिरीसामने - १९९धावा - ४५६८सर्वोत्तम धाव - ८४*सरासरी - ४१.५२स्ट्राईक रेट - १३७.६७अर्धशतकं - २३चौकार - ३०६षटकार - २१५ 

टॅग्स :IPL 2020महेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्सराजस्थान रॉयल्स