Join us  

CSK vs RR : IPLच्या इतिहासात CSK वर प्रथमच ओढावली नामुष्की; राजस्थाकडून मानहानीकारक पराभव 

Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वात चेन्नई सुपर किंग्सच्या ( Chennai Super Kings) बाबतीत अनपेक्षित निकाल पाहायला मिळाला. IPLच्या इतिहातास आतापर्यंत जे घडले नव्हते ते महेंद्रसिंग धोनीच्या ( MS Dhoni) संघासोबत घडले.

By स्वदेश घाणेकर | Published: October 19, 2020 10:55 PM

Open in App

Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वात चेन्नई सुपर किंग्सच्या ( Chennai Super Kings) बाबतीत अनपेक्षित निकाल पाहायला मिळाला. IPLच्या इतिहातास आतापर्यंत जे घडले नव्हते ते महेंद्रसिंग धोनीच्या ( MS Dhoni) संघासोबत घडले. IPL च्या प्रत्येक पर्वात Play Off पर्यंत मजल मारणाऱ्या CSKला प्रथमच अपयश पचवावे लागले. राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) आणि CSK या दोन्ही संघांसाठी आजचा सामना अत्यंत महत्त्वाचा होता. त्यामुळे सामना चुरशीचा होईल, अशी सर्वांना अपेक्षा होती. पण, धोनीच्या संघातील महारथींनी आज पाट्या टाकल्या आणि एकतर्फी झालेल्या सामन्यात RRनं बाजी मारून प्ले ऑफच्या शर्यतीत स्वतःला कायम राखले.

चेन्नई सुपर किंग्सला या पराभवानंतर १० सामन्यांत ७ पराभवासह तळाला समाधान मानावे लागले आहे. आजच्या निकालानं त्यांना प्ले ऑफच्या शर्यतीतूनही जवळपास बाहेर फेकले आहे. राजस्थान रॉयल्सनं १० सामन्यांत ४ विजयासह ८ गुणांची कमाई करत आव्हान कायम राखले आहे. प्रथम फलंदाजीला आलेल्या फॅफ ड्यू प्लेसिस आणि सॅम कुरन यांना मोठे फटके मारण्यापासून राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी रोखले. जोफ्रा आर्चरनं पुन्हा भेदक मारा करताना प्रतिस्पर्धी फलंदाजांना जखडून ठेवले. त्याचे फळ तिसऱ्या षटकात मिळाले. आर्चरच्या बाऊंसरवर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं फटका मारणाऱ्या फॅफ ड्यू प्लेसिसला ( १०)  माघारी जावं लागले. शेन वॉटसन ( ८), अंबाती रायुडू ( १३) आणि सॅम कुरन ( २२) माघारी परतले.

कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि रवींद्र जडेजा यांनी पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. पण, राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांच्या टिच्चून माऱ्यासमोर त्या दोघांना धावा घेताना चाचपडावे लागले. १८व्या षटकात २८ धावांवर धोनी धावबाद झाला. चेन्नईला २० षटकांत ५ बाद १२५ धावा करता आल्या. जडेजा ३५ धावांवर नाबाद राहिला.  

प्रत्युत्तरात राजस्थानची सुरुवातही निराशाजनक झाली. बेन स्टोक्स  (१९), रॉबीन उथप्पा ( ४) आणि संजू सॅमसन ( ०) यांना लगेच माघारी जावे लागले. महेंद्रसिंग धोनीनं पाचव्या षटकात दीपक चहरच्या गोलंदाजीवर घेतलेला झेल पाहून सारेच थक्क झाले. RRचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि जोस बटलर यांनी CSKच्या गोलंदाजांचा सामना करताना गाडी रुळावर आणली. धोनीनं पहिल्या दहा षटकांत दीपक चहर ( २/१८) व जोश हेझलवूड ( १/१९) यांचे प्रत्येकी चार षटक वापरली. बटलर व स्मिथ यांनी अर्धशतकी भागीदारी करताना राजस्थानला विजयी मार्गावर ठेवले. बटलरने ३७ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. दुसऱ्या बाजूनं स्मिथ संयमी खेळ करत होता. त्यानं नाबाद २५ धावा केल्या. बटलर ४८ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ७० धावांवर नाबाद राहिला. राजस्थाननं १७.३ षटकांत ३ फलंदाजांच्या मोबदल्यात १२६ धावा करून विजय पक्का केला. 

टॅग्स :IPL 2020चेन्नई सुपर किंग्सराजस्थान रॉयल्सस्टीव्हन स्मिथमहेंद्रसिंग धोनी