CSK vs SRH Latest News : महेंद्रसिंग धोनीला बाद करण्यासाठी संदीप शर्मानं घेतली सुपर डाईव्ह, पण...; पाहा व्हिडीओ

चेन्नईनं आजच्या सामन्यात आक्रमक रणनीती वापरली. सॅम कुरन, शेन वॉटसन, अंबाती रायुडू आणि महेंद्रसिंग धोनी यांनी बॅटीवर हात साफ करताना CSKला समाधानकारक पल्ला गाठून दिला. 

By स्वदेश घाणेकर | Published: October 13, 2020 09:45 PM2020-10-13T21:45:51+5:302020-10-13T21:46:17+5:30

whatsapp join usJoin us
CSK vs SRH Latest News : Ohh Sandeep Sharma! Sandeep Sharma flies for a catch, Watch Video | CSK vs SRH Latest News : महेंद्रसिंग धोनीला बाद करण्यासाठी संदीप शर्मानं घेतली सुपर डाईव्ह, पण...; पाहा व्हिडीओ

CSK vs SRH Latest News : महेंद्रसिंग धोनीला बाद करण्यासाठी संदीप शर्मानं घेतली सुपर डाईव्ह, पण...; पाहा व्हिडीओ

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

CSK vs SRH Latest News : महेंद्रसिंग धोनीच्या ( MS Dhoni) नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सला ( Chennai Super Kings) यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यांनी ७ पैकी केवळ दोनच सामने जिंकले आहेत आणि प्ले ऑफच्या आशा जीवंत ठेवण्यासाठी त्यांना ७ पैकी ६ सामने जिंकावे लागणार आहेत. तसं न झाल्यास IPL च्या इतिहासात प्रथमच CSK प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यात अपयशी ठरतील. त्यामुळेच चेन्नईनं आजच्या सामन्यात आक्रमक रणनीती वापरली. सॅम कुरन, शेन वॉटसन, अंबाती रायुडू आणि महेंद्रसिंग धोनी यांनी बॅटीवर हात साफ करताना CSKला समाधानकारक पल्ला गाठून दिला. 

चेन्नई पहिला परतीचा सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळत आहे आणि नाणेफेक जिंकून CSKने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईनं आक्रमक पवित्रा घेताना सॅम कुरनला सलामीला पाठवले. फॅफ ड्यू प्लेसिस आणि कुरन यांनी CSKच्या डावाची सुरुवात केली. पहिल्या दोन षटकात ड्यू प्लेसिसला एकाही चेंडूंचा सामना करता आला नाही आणि तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर संदीप शर्मानं CSKला ड्यू प्लेसिसच्या (०) रुपानं पहिला धक्का दिला. कुरननं फटकेबाजी केली. संदीप शर्मानं त्याचा अडथळा दूर केला. कुरन २१ चेंडूंत ३१ धावांवर माघारी परतला. 

शेन वॉटसन आणि अंबाती रायुडू यांनी तिसऱ्या विकेटसाठई ८१ धावांची भागीदारी केली. खलील अहमदनं SRHला यश मिळवून देताना रायुडूला ( ४१) बाद केले. पुढच्याच षटकात टी नटराजननं CSKला आणखी एक धक्का दिला. वॉटसन ३८ चेंडूंत १ चौकार व ३ षटकारांसह ४२ धावा करून माघारी परतला. त्यानंतर SRHनं सामन्यावर पकड घेऊ पाहिली. १८व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर संदीप शर्मानं स्वतःच्याच गोलंदाजीवर महेंद्रसिंग धोनी साठी मारलेली डाईव्ह 'सुपर' ठऱली. संदीपनं ४ षटकांत १९ धावा देत २ विकेट्स घेतल्या. धोनी १३ चेडूंत २१ धावा करून माघारी परतला. रवींद्र जडेजानं १० चेंडूंत २५ धावा करताना चेन्नईला ६ बाद १६७ धावांचा पल्ला गाठून दिला. ( CSK २०१०चा करिष्मा करून दाखवणार, आकडे सांगतात IPL 2020 जिंकणार!; आकाश चोप्राचं ट्विट व्हायरल

संदीप शर्माची सुपर डाईव्ह पाहाच..

 

Web Title: CSK vs SRH Latest News : Ohh Sandeep Sharma! Sandeep Sharma flies for a catch, Watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.