कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर इंडियन प्रीमिअर लीगचेही भवितव्य अधांतरी लटकले आहे. त्यात ट्वेंटी-20 वर्ल्ड कप खेळवण्याचा निर्णय झाल्यास आयपीएल होणे अशक्यच आहे. तरीही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ( बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीनं सर्व राज्य संघटनांना आयपीएलसाठी सज्ज राहण्यास सांगितले आहे. आयपीएलच्या 13व्या मोसमाच्या आयोजनासाठी बीसीसीआय सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. त्यात आता महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सनं ( CSK) बीसीसीआयसमोर अट ठेवली आहे.
तीन वेळा आयपीएल जेतेपद पटकावणाऱ्या CSKने आयपीएलचा 13 हा हंगाम झाल्यास तो पूर्ण खेळवावा, स्पर्धा वेळापत्रकाला कोणतीच कात्री लावली जाऊ नये, अशी इच्छा व्यक्त केली आहे. बीसीसीआयनं अजून आयपीएलबाबत कोणताच निर्णय घेतलेला नाही. पण, बीसीसीआय कोणताही निर्णय घेईल, तो मान्य असेल असे CSKकडून सांगण्यात आले. पण, स्पर्धेच्या वेळापत्रकाला कात्री नको, असे त्यांचे म्हणणे आहे. आयपीएल झाल्यास त्यात परदेशी खेळाडूंच्या सहभागावरही प्रश्नचिन्ह आहे. कोरोना व्हायरसमुळे अजूनही प्रवास बंधनं आहेत. त्यामुळे बीसीसीआयनं हाही प्रश्न सोडवावा, अशी मागणी CSKकडून करण्यात आल्याचे सूत्रांकडून समजत आहे.
सचिन तेंडुलकरचा बंगला आतून कसा दिसतो माहित्येय? पाहा Photo
दरम्यान, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे चेअरमन कार्ल एडींग यांनी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप बाबत मोठ अपडेट दिली. एडींग यांनी सांगितले की,''ट्वेंटी-20 वर्ल्ड कप यंदा होणार नाही किंवा स्थगित करण्यात आला, याबाबतची अजूनही अधिकृत घोषणा झालेली नाही. जगभरातील सर्वच देशांमध्ये कोरोना संकट आहे आणि त्यापैकी 16 देशांतील संघांना आम्ही ऑस्ट्रेलियात आणण्याचा प्रयत्न करत आहोत. पण, हे वास्तववादी नाही किंवा खूप खूप अवघड आहे.''
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप बाबत बीसीसीआयला अजूनही आयसीसीच्या निर्णयाची प्रतीक्षा करावी लागेल. त्यानंतर आयपीएलच्या वेळापत्रकाबाबत निर्णय घेता येईल. दरम्यान, 10 जूनला आयसीसीच्या बैठकीनंतर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी राज्य संघटनांना पत्र पाठवून आयपीएलसाठी तयारी करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे एडींग यांच्या विधानानं बीसीसीआयला आनंद झाला आहे. पण, तरीही भारतातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आयपीएलचे आयोजन देशाबाहेर होण्याची शक्यता अधिक आहे. संयुक्त अरब अमिराती आणि श्रीलंका क्रिकेट मंडळानं आयपीएल आयोजनाची तयारी दर्शवली आहे.
Well Done; CSK साठी मोची काम करणाऱ्या भास्करन यांना इरफान पठाणची आर्थिक मदत!
कोरोनामुक्त झालेल्या देशात पुन्हा कोरोनाचा शिरकाव, परदेशातून आलेले प्रवासी 'पॉझिटिव्ह'
शाळकरी मुलांचं पोट भरण्यासाठी स्टार खेळाडूनं जमा केले 191 कोटी; आता थेट सरकारला लिहिलं पत्र!
खेल रत्न पुरस्कारासाठी 'गोल्डन गर्ल' हिमा दासच्या नावाची शिफारस
टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत दाखवणार होती दम; पण 16 व्या वर्षीच विश्वविजेत्या खेळाडूला मृत्यूनं कवटाळलं
Web Title: CSK Wants Full-fledged IPL, Asks BCCI To Sort Out Travel Of Foreign Players
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.