सीएसकेची योजना ठरली! ...हीच त्यांची खरी ताकद

आता सीएसकेकडे ४८ कोटी रुपये उरले असून या रकमेतून त्यांना आपला संघ बळकट करायचा आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 10:54 AM2022-02-09T10:54:46+5:302022-02-09T10:55:40+5:30

whatsapp join usJoin us
CSK's plan worked out, This is their real strength | सीएसकेची योजना ठरली! ...हीच त्यांची खरी ताकद

सीएसकेची योजना ठरली! ...हीच त्यांची खरी ताकद

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

चेन्नई सुपरकिंग्स... आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक संघ. आगामी लिलावासाठी सीएसकेने ९० कोटींपैकी ४२ कोटी खर्च केले आहेत आणि रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी, ऋतुराज गायकवाड, मोइन अली या चार खेळाडूंना संघात कायम राखले. आता सीएसकेकडे ४८ कोटी रुपये उरले असून या रकमेतून त्यांना आपला संघ बळकट करायचा आहे. साधारणपणे टी-२० संघ निवडताना प्रत्येकजण युवा खेळाडूंवर लक्ष देतो, पण सीएसके अनुभवाला प्राधान्य देत आला आहे आणि हीच त्यांची ताकद ठरली. सीएसकेच्या याच योजनेवर आपल्या यू ट्यूब चॅनेलवरून प्रकाश टाकला आहे माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांनी.

अनुभवी खेळाडूंवर लक्ष द्या
गाजलेले खेळाडू : शेन वॉटसन, फाफ डूप्लेसिस, मुरली विजय, अंबाती रायुडू, केदार जाधव, पीयूष चावला, आशिष नेहरा, इरफान पठाण, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा.
यांना आहे संधी : अंबाती रायुडू, दिनेश कार्तिक, रविचंद्रन अश्विन, रॉबिन उथप्पा, डेव्हिड वॉर्नर, द्वेन ब्राव्हो, ल्यूक फर्ग्युसन, नॅथन कुल्टर-नाइल, शाकिब अल् हसन, फाफ डूप्लेसिस, जयंत यादव.

अष्टपैलू खेळाडू निवडा
गाजलेले खेळाडू : शार्दुल ठाकूर, शेन वॉटसन, ॲल्बी मॉर्कल, मोइन अली, माईक हसी, मॅथ्यू हेडन, डेव्हिड विली, द्वेन ब्रावो, इरफान पठाण, रवींद्र जडेजा.
यांना आहे संधी : शाकिब अल् हसन, कृणाल पांड्या, नॅथन कुल्टर-नाइल, शार्दुल ठाकूर, जेसन होल्डर, मिशेल मार्श, जेम्स नीशाम, शिवम दुबे, विजय शंकर, दीपक हुडा, ख्रिस जॉर्डन.

स्विंग मारा करणाऱ्यांना संधी द्या
गाजलेले खेळाडू : मोहित शर्मा, सुदीप त्यागी, मनप्रीत गोनी, दीपक चाहर, शार्दुल ठाकूर, ड्वेन ब्राव्हो, सॅम कुरेन, ॲल्बी मॉर्कल.
यांना आहे संधी : दीपक चाहर, शार्दुल ठाकूर, सॅम कुरेन,ड्वेन ब्राव्हो.

लेग स्पिनर्स ठरतात फायदेशीर
गाजलेले खेळाडू : कर्ण शर्मा, पीयूष चावला, इम्रान ताहिर.
यांना आहे संधी : राहुल चहर, युझवेंद्र चहल, मुजीब उर रहमान, इम्रान ताहिर, ॲडम झम्पा.

डावखुऱ्या खेळाडूंचा घ्या फायदा
गाजलेले खेळाडू : आशिष नेहरा, माईक हसी, मॅथ्यू हेडन, डग बॉलिंजर, सॅम कुरेन, ॲल्बी मॉर्कल, सुरेश रैना, मोइन अली, रवींद्र जडेजा.
यांना आहे संधी : शिखर धवन, ट्रेंट बोल्ट, मुस्तफिझूर रहमान, टी. नटराजन, ओबेड मॅककॉय, टायमल मिल्स.

लिलावातील सीएसकेचे संभाव्य खेळाडू 
फाफ डूप्लेसिस, शिखर धवन, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, रविचंद्रन अश्विन, शाकिब अल् हसन, जोश हेझलवूड, युझवेंद्र चहल, राहुल चहर.
 

Web Title: CSK's plan worked out, This is their real strength

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.