Join us  

बीसीसीआयवर वाढता दबाव; चिनी कंपनींसोबतचे करार संपुष्टात आणा, अन्यथा...

IPL गव्हर्निंग काऊंसिलने बोलावली बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 12:59 PM

Open in App

लडाखमध्ये चिनी सैन्याची घुसखोरी आणि परवा गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांशी झालेल्या झटापटीत 20 भारतीय जवानांना आलेले वीरमरण यामुळे सध्या भारत आणि चीनमध्ये कमालीचा तणाव निर्माण झालेला आहे .देशातील सर्व स्तरांमधून चीनचा निषेध करून चीन आणि चिनी मालावर बहिष्कार घालण्याची मागणी होत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( बीसीसीआय) त्यांच्या चिनी प्रायोजकांवर बहिष्कार घालतील का, हा मुद्दा सध्या चर्चिला जात आहे. त्यातच व्यापार आणि उद्योग संघटनेनं ( CTI) बीसीसीआयचा पत्र पाटवून चिनी कंपनींसोबतचे सर्व करार संपुष्टात आणण्यास सांगितले आहे.  

Shocking : सौरव गांगुलीच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण 

चिनी मोबाईल कंपनी VIVO हे आयपीएलचे स्पॉन्सर आहेत आणि 2022पर्यंत त्यांनी 2199 कोटींचा करार केला आहे. पण, दोन दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ( बीसीसीआय) खजिनदार अरुण धुमाल यांनी करार मोडता येणार नसल्याचे स्पष्ट केले होते. पण, चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याच्या वाढत्या मागणीमुळे आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलनं पुढील आठवड्यात तातडीची बैठक बोलावली आहे. आयपीएलनं ट्विट केलं की,''भारत-चीन सीमेवर झालेल्या झटापटीत आपले जवान शहीद झाले. त्या पार्श्वभूमीवर आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलनं पुढील आठवड्यात विविध स्पॉन्सरशीपच्या कराराचे पुनरावलोकन करण्यासाठी पुढील आठवड्यात बैठक बोलावली आहे.''

CTIचे संयोजक ब्रिजेश गोयल यांनी लिहिले की,''जर बीसीसीआयनं चिनी कंपनींसोबतचे करार रद्द न केल्यास देशभरातील व्यापारी  इंडियन प्रीमिअर लीगसह ( आयपीएल) अन्य आंतरराष्ट्रीय सामन्यांवर बहिष्कार टाकलीत.''

बाबो; 20 सेकंदाचा 'सोपा' व्यायाम जमतो का बघा; हरभजन सिंगनं शेअर केलेला Video Viral

चिनी स्पॉन्सर्सबाबत IPL गव्हर्निंग काऊंसिल मोठा निर्णय घेणार? बोलावली तातडीची बैठक

युजवेंद्र चहल अजूनही धक्क्यातून सावरलेला नाही; पोस्ट केला वेदनादायक फोटो

टॅग्स :बीसीसीआयचीन