सिडनी : आयपीएल लिलावात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आणि वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याला हैदराबादने २०.५० कोटींत संघात घेतले, यावर विश्वास बसत नाही, असे मत माजी दिग्गज गोलंदाज जेसन गिलेस्पी याने व्यक्त केले. कमिन्स उत्कृष्ट गोलंदावज असला तरी टी-२० प्रकारात प्रभावहीन ठरतो. त्याच्यासाठी ही रक्कम फार मोठी आहे, असे गिलेस्पीने सांगितले.
पॅट कमिन्स इतक्या मोठ्या बोलीलायक नव्हता? या प्रश्नावर गिलेस्पी म्हणाला, ‘मला असे वाटते!’ गिलेस्पीने कमिन्सच्या टी-२० तील यशस्वी कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तो म्हणाला, ‘कमिन्स महान कसोटी गोलंदाज असला तरी माझ्या मते तो टी-२० तितका प्रभावी वाटत नाही. तो गुणवान गोलंदाज आणि यशस्वी कर्णधार असला तरी टी-२० हा त्याचा सर्वोत्कृष्ट प्रकार असावा असे वाटत नाही. माझे वैयक्तिक मत असे की पॅट एक कसोटी गोलंदाज आहे. कसोटी क्रिकेटमध्ये तो उत्कृष्ट ठरतो. त्याला टी-२० त इतकी रक्कम मिळाल्याचे आश्चर्य वाटते. ही रक्कम त्याच्यासाठी फार मोठी आहे.’
मिचेल स्टार्कचे केले कौतुक
गिलेस्पीने २४.७५ कोटी इतकी सर्वांत मोठी रक्कम मिळाल्याबद्दल डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कचे कौतुक केले. तो म्हणाला, ‘मिचेलला इतकी अधिक रक्कम मिळण्याचा अर्थ संघ डावखुरे वेगवान गोलंदाज आणि स्विंग गोलंदाजांना किती महत्त्व देतात, असा लावता येईल. स्टार्कबाबत केकेआरने योग्य आणि चांगली खरेदी केली. आयपीएल दीर्घ चालणारी लीग असल्याने मी मिचेलबाबत खूष आहे.’
Web Title: Cummins got 20.50 crores, not in the universe: Gillespie
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.