सध्याच्या घडीतील जगातील टॉप सहा फलंदाज; जाणून घ्या प्रत्येकाचा न मोडला जाणारा रिकॉर्ड!

One unbreakable record of top 6 current batsmen विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ, केन विलियम्सन आणि जो रूट या 'फॅब फोर'ची वारंवार चर्चा केली जाते.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 01:48 PM2021-05-27T13:48:32+5:302021-05-27T13:50:04+5:30

whatsapp join usJoin us
The current top six batsmen in the world; One unbreakable record of top 6 current batsmen | सध्याच्या घडीतील जगातील टॉप सहा फलंदाज; जाणून घ्या प्रत्येकाचा न मोडला जाणारा रिकॉर्ड!

सध्याच्या घडीतील जगातील टॉप सहा फलंदाज; जाणून घ्या प्रत्येकाचा न मोडला जाणारा रिकॉर्ड!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ, केन विलियम्सन आणि जो रूट या 'फॅब फोर'ची वारंवार चर्चा केली जाते. हे चारही फलंदाज दर्जेदार खेळाडू आहेत आणि त्यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीनं जगाला मंत्रमुग्ध केले आहे. पण, या फॅब फोरमध्ये आणखी दोन खेळाडूंना अॅड केले तर. ही दोन फलंदाज म्हणजे रोहित शर्मा व बाबर आझम... जगातील या सहा टॉप फलंदांजांनी अनेक अविश्वसनीय विक्रमांची नोंद केली आहे. पण, या प्रत्येकानं स्वतःच्या नावावर एका एक विक्रम नोंदवला आहे की तो मोडणं अवघड आहे...  ( One unshakeable record by top batsmen) 

रोहित शर्मा ( Rohit Sharma) - भारतीय संघाचा वन डे व ट्वेंटी-२० संघाचा सलामीवीर रोहित शर्मा यापूर्वी मधल्या फळीत खेळायचा. पण, तो सलामीला येऊ लागला अन् विक्रमांचा पाऊस पाडू लागला. वन डे क्रिकेटमध्ये तीन द्विशतकं नावावर असलेला तो जगातील एकमेव फलंदाज आहे. २०१४मध्ये श्रीलंकेविरुद्ध १५३ चेंडूंत ३३ चौकार व ९ षटकारासह २६४ धावांची खेळी केली. वन डे क्रिकेटमध्ये २६४ धावांच्या सर्वोत्तम वैयक्तिक खेळीचा विक्रम मोडणे अवघड आहे. जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ कोणते? BCCIची कमाई जाणून उडेल झोप!


विराट कोहली ( Virat Kohli) - आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सध्याच्या घडीचा आघाडीचा फलंदाज. भारताच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या विराट कोहलीची प्रत्येक खेळी ही विक्रमाला गवसणी घालणारी असते. सचिन तेंडुलकरचा १०० शतकांचा विक्रम विराट कोहली मोडेल असा अनेकांना विश्वास वाटतोय. २०१६-१७मध्ये चार सलग कसोटी सामन्यांत चार द्विशतकं झळकावण्याचा विक्रम त्यानं नावावर केला होता. त्याचा हा विक्रम मोडणे शक्य नाही.   IPL 2021 Remaining Matches : तारीख ठरवली पण, खेळायला खेळाडू कुठेत?; BCCIची डोकेदुखी वाढलीय!


जो रूट ( Joe Root) - इंग्लंडच्या कसोटी क्रिकेटला एक वेगळं वळण देणारा कर्णधार. २०१७मध्ये त्यानं कसोटी संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी खांद्यावर घेतली.  त्यानं परदेशात सलग पाच कसोटी सामने जिंकण्याचा विक्रम नावावर केला. त्यानं श्रीलंकेला २०१८ मध्ये ३-० व २०२१मध्ये २-० असे पराभूत केले. नुकत्याच केलेल्या श्रीलंका दौऱ्यावर त्यानं पहिल्या कसोटीत २२८ आणि दुसऱ्या कसोटीत १८६ धावा केल्या. त्यानंतर भारतात दाखल होताच पहिल्या कसोटीत २१८ धावांची खेळी केली. कसोटी क्रिकेटमध्ये सलग तीन सामन्यांत १५०+ धावा करणारा तो पहिला कसोटी कर्णधार ठरला.  तुम्ही स्वतः देशाची वाट लावताय!; बॉयफ्रेंडनं असं म्हणून उडवली पाकिस्तानची टिंगल, अभिनेत्रीनं मोडला साखरपुडा


केन विलियम्सन ( Kane Williamson) - मिस्टर कूल या नावानं न्यूझीलंडचा कर्णधार ओळखला जातो.  २०१६मध्ये त्यानं एक मोठा विक्रम नावावर केला. कसोटी खेळणाऱ्या ९ विविध संघांविरुद्ध शतक झळकावणारा तो सर्वात युवा फलंदाज ठरला. त्यानं २०१६मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध शतक झळकावून हा विक्रम केला. २६व्या वर्षी त्यानं हा पराक्रम केला. टेनिसपटू गॅब्रिएलाला प्रपोज करण्यासाठी अर्जेंटिनामध्ये गेले होते रवी शास्त्री, बॉलिवूड अभिनेत्रींसोबतही जोडलं गेलं नाव


स्टीव्ह स्मिथ ( Steve Smith) -  स्टीव्ह स्मिथनं १२६ कसोटी डावांत ७००० धावा पूर्ण केल्या. ६०पेक्षा अधिकच्या सरासरीनं कसोटीत ७००० धावा करणारा तो पहिला फलंदाज आहे. शिवाय ७३ वर्षांच्या इतिहासात सर्वात जलद हा पल्ला सर करणारा फलंदाज आहे. स्मिथनं आतापर्यंत ७७ कसोटीत ६२च्या सरासरीनं ७५४० धावा केल्या आहेत.

 
बाबर आझम ( Babar Azam ) - पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबरची सातत्यानं विराटशी तुलना केली जातेय. सर्व फॉरमॅटमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे.  वन डे क्रिकेटमध्ये त्यानं २५ डावांत १३०६ धावा केल्या आहेत. २०१६मध्ये त्यानं विंडीजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत ३६० धावा केल्या होत्या. एका मालिकेतील ही सर्वाधिक धावसंख्या ठरली.  

 

Web Title: The current top six batsmen in the world; One unbreakable record of top 6 current batsmen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.