विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ, केन विलियम्सन आणि जो रूट या 'फॅब फोर'ची वारंवार चर्चा केली जाते. हे चारही फलंदाज दर्जेदार खेळाडू आहेत आणि त्यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीनं जगाला मंत्रमुग्ध केले आहे. पण, या फॅब फोरमध्ये आणखी दोन खेळाडूंना अॅड केले तर. ही दोन फलंदाज म्हणजे रोहित शर्मा व बाबर आझम... जगातील या सहा टॉप फलंदांजांनी अनेक अविश्वसनीय विक्रमांची नोंद केली आहे. पण, या प्रत्येकानं स्वतःच्या नावावर एका एक विक्रम नोंदवला आहे की तो मोडणं अवघड आहे... ( One unshakeable record by top batsmen)
रोहित शर्मा ( Rohit Sharma) - भारतीय संघाचा वन डे व ट्वेंटी-२० संघाचा सलामीवीर रोहित शर्मा यापूर्वी मधल्या फळीत खेळायचा. पण, तो सलामीला येऊ लागला अन् विक्रमांचा पाऊस पाडू लागला. वन डे क्रिकेटमध्ये तीन द्विशतकं नावावर असलेला तो जगातील एकमेव फलंदाज आहे. २०१४मध्ये श्रीलंकेविरुद्ध १५३ चेंडूंत ३३ चौकार व ९ षटकारासह २६४ धावांची खेळी केली. वन डे क्रिकेटमध्ये २६४ धावांच्या सर्वोत्तम वैयक्तिक खेळीचा विक्रम मोडणे अवघड आहे. जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ कोणते? BCCIची कमाई जाणून उडेल झोप!
जो रूट ( Joe Root) - इंग्लंडच्या कसोटी क्रिकेटला एक वेगळं वळण देणारा कर्णधार. २०१७मध्ये त्यानं कसोटी संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी खांद्यावर घेतली. त्यानं परदेशात सलग पाच कसोटी सामने जिंकण्याचा विक्रम नावावर केला. त्यानं श्रीलंकेला २०१८ मध्ये ३-० व २०२१मध्ये २-० असे पराभूत केले. नुकत्याच केलेल्या श्रीलंका दौऱ्यावर त्यानं पहिल्या कसोटीत २२८ आणि दुसऱ्या कसोटीत १८६ धावा केल्या. त्यानंतर भारतात दाखल होताच पहिल्या कसोटीत २१८ धावांची खेळी केली. कसोटी क्रिकेटमध्ये सलग तीन सामन्यांत १५०+ धावा करणारा तो पहिला कसोटी कर्णधार ठरला. तुम्ही स्वतः देशाची वाट लावताय!; बॉयफ्रेंडनं असं म्हणून उडवली पाकिस्तानची टिंगल, अभिनेत्रीनं मोडला साखरपुडा