England vs Ireland 2nd ODI: इंग्लंड विरुद्ध आयर्लंड यांच्यातल्या दुसऱ्या वन डे सामन्यातही यजमानांनी बाजी मारून तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. सलामीवर जॉनी बेअरस्टो ( 82), सॅम बिलिंग ( 46*) आणि डेव्हिड विली ( 47*) यांनी इंग्लंडला विजय मिळवून दिला. असे असले तरी या सामन्यात आयर्लंडच्या 21 वर्षीय अष्टपैलू खेळाडू कर्टीस कॅम्फर भाव खाऊन गेला. त्यानं रमीज राजा, मोहम्मद युसूफ, डेव्हिड हसी या दिग्गजांच्या विक्रमाच्या पंक्तित स्थान पटकावले.
मोठी बातमी; IPL बरोबर यूएईत रंगणार महिलांची ट्वेंटी-20 चॅलेंज लीग, सौरव गांगुलीनं दिले संकेत
नाणेफेक जिंकून आयर्लंडनं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पाचव्या षटकात विलीनं आयर्लंडचा सलामीवीर गॅरेथ डेनली ( 0) याला माघारी पाठवले. त्यानंतर पॉल स्ट्रीलिंगला ( 12) बाद करून विलीनं आयर्लंडला मोठा धक्का दिला. जेम्स व्हिन्सनं आयर्लंडचा कर्णधार अँडी बॅलबीर्नी ( 15) ची विकेट घेतली. त्यानंतर रशीदनं आयर्लंडला तीन धक्के दिले. हॅरी टेक्टरची विकेट घेऊन रशीदनं नावावर विक्रम नोंदवला. रशीदनं 10 षटकांत 34 धावा देताना 3 विकेट्स घेतल्या. इंग्लंडकडून वन डे क्रिकेटमध्ये 150 विकेट्स घेणारा तो पहिलाच फिरकीपटू ठरला.
पहिल्या सामन्य़ात अर्धशतकी खेळी करणाऱ्या कर्टीस कॅम्फरनं आयर्लंडला याही सामन्यात आधार दिला. त्यानं सातव्या विकेटसाठी सिमी सिंगसह अर्धशतकी भागीदारी केली. त्यानंतर कर्टीस आणि अँडी मॅकब्रीन यांनी फटकेबाजी करताना अर्धशतकी भागीदारी करून संघाला दोनशे धावांचा पल्ला पार करून दिला. पहिल्या दोन आंतरराष्ट्रीय वन डे सामन्यांत शतक झळकावणारा कर्टीस हा आयर्लंडचा पहिलाच खेळाडू ठरला. या सामन्यात त्यानं 87 चेंडूंत 8 चौकारांसह 68 धावा केल्या. आयर्लंडनं 50 षटकांत 9 बाद 212 धावा केल्या. इंग्लंडनं 32.2 षटकांत 6 विकेट्सच्या मोबदल्यात हे लक्ष्य पार केले.
कर्टीसनं 2 विकेट्स घेताना आयर्लंडसाठी पुन्हा एकदा दमदार कामगिरी केली. कारकिर्दीच्या पहिल्या दोन आंतरराष्ट्रीय वन डे सामन्यांत अर्धशतकी खेळी करणारा तो आयर्लंडचा पहिलाच फलंदाज ठरला. शिवाय त्यानं रमीज राजा, मोहम्मद युसूफ, डेव्हिड हसी आणि अफसर झझाई यांच्या पंक्तित स्थान पटकावले. या सर्वांनी परदेशात खेळलेल्या कारकिर्दीतील पहिल्या दोन वन डे सामन्यांत अर्धशतकं झळकावली होती.
- रमीज राजा ( पाकिस्तान) 75 व 59 धावा वि. न्यूझीलंड, 1995
- मोहम्मद युसूफ ( पाकिस्तान ) 59* व 66 धावा वि. झिम्बाब्वे, 1998
- डेव्हिड हसी ( ऑस्ट्रेलिया) 50 व 52 धावा वि. वेस्ट इंडिज, 2008
- अफसर झझाई ( अफगाणिस्तान) 60 व 51 धावा वि. यूएई, 2014
- कर्टीस कॅम्फर ( आयर्लंड) 59 * व 68 धावा वि. इंग्लंड 2020
Web Title: CURTIS CAMPHER became a fifth player to Scoring 50+ runs in both their first two ODIs, both being in away matches
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.