Cute pic : शकिब अल हसननं शेअर केला त्याच्या एक महिन्याच्या नन्हीपरीचा फोटो

बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शकिब अल हसन याच्या घरी पुन्हा एकदा पाळणा हलला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 05:00 PM2020-05-25T17:00:17+5:302020-05-25T17:00:50+5:30

whatsapp join usJoin us
Cute pic: Shakib Al Hasan shared a photo of his one month old baby svg | Cute pic : शकिब अल हसननं शेअर केला त्याच्या एक महिन्याच्या नन्हीपरीचा फोटो

Cute pic : शकिब अल हसननं शेअर केला त्याच्या एक महिन्याच्या नन्हीपरीचा फोटो

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शकिब अल हसन याच्या घरी पुन्हा एकदा पाळणा हलला. रमजानच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 24 एप्रिलला त्याला कन्यारत्न प्रात्पी झाली होती. शकिबनं त्याच्या मुलीचं नाव इरम हसन असे ठेवले आणि त्याचा अर्थ जन्नत असा होतो. शकिबच्या पहिल्या मुलीचं नाव अलायना औब्रेय हसन असे आहे. शकिबनं त्याच्या एक महिन्याच्या मुलीचा फोटो ईदच्या दिवशी सोशल मीडियावर शेअर केला. 

शकिब आणि त्याची पत्नी शिशीर यांची लंडनमध्ये 2010साली कौंटी क्रिकेट स्पर्धेदरम्यान भेट झाली. कौंटी क्रिकेटमध्ये खेळणारा शकिब हा पहिला बांगलादेशी खेळाडू आहे. शिशीर ही लंडनमध्ये उच्चशिक्षणासाठी गेली होती. भेटीनंतर दोघ एकमेकांना आवडू लागले. दोन वर्षांच्या प्रेमप्रकरणानंतर शकिब व शिशीर यांनी 2012मध्ये लग्न केलं. तीन वर्षानंतर या जोडीला कन्यारत्न प्राप्ती झाली.  


आयसीसीतर्फे अनेक प्रश्न अनुत्तरित : शाकिब
क्रिकेट पुन्हा सुरू करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) दिशानिर्देशांमध्ये अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत आणि कोरोना व्हायरसमुळे निलंबनानंतर क्रिकेट पुन्हा सुरू करण्यापूर्वी काही मुद्यांवर चर्चा होणे आवश्यक आहे, असे बांगलादेशचा निलंबित अष्टपैलू शाकिब-अल-हसनने म्हटले आहे.

कोविड-१९ महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आल्यानंतर सदस्य देश यात आता काही प्रमाणात सूट देत आहेत. आयसीसीने क्रिकेट पुन्हा सुरू करण्यासाठी शुक्रवारी दिशानिर्देश जाहीर केले. त्याचसोबत उच्च पातळीवर सुरक्षा उपाययोजनाही केल्या जात आहेत.

कथित सट्टेबाजाने संपर्क साधल्याची माहिती न दिल्यामुळे वर्षभरासाठी निलंबनाच्या कारवाईला सामोरा जात असलेला शाकिब म्हणाला,‘कोविड-१९ चे संक्रमण केवळ तीन किंवा सहा नवे तर १२ फूट अंतरावरुनही होऊ शकते, असे ऐकायला मिळत आहे. याचा अर्थ षटक संपल्यानंतर फलंदाजांना एकमेकांच्या जवळ जाता येणार नाही.’ तो म्हणाला,‘मग त्यांना आपल्याच टोकाला उभे राहावे लागेल ? स्टेडियममध्ये कुणी प्रेक्षक राहणार नाही ? यष्टिरक्षक दूर उभा राहील ? जवळच्या क्षेत्ररक्षकांचे काय होईल ? या सर्व मुद्यांवर चर्चा होणे आवश्यक आहे.
 

Web Title: Cute pic: Shakib Al Hasan shared a photo of his one month old baby svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.