पाकिस्तानचं काही खरं नाही! "क़ुदरत का निज़ाम" त्यांच्या विरोधात, सेमी फायनल अवघड

ICC ODI World Cup 2023 Semi Final Scenario : भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका हे वर्ल्ड कप स्पर्धेचे तीन सेमी फायनलिस्ट ठरले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 09:09 PM2023-11-08T21:09:00+5:302023-11-08T21:09:38+5:30

whatsapp join usJoin us
CWC23 : No spell of heavy rain predicted which means New Zealand vs Sri Lanka match will not be a washout, Pakistan semi final spot in danger | पाकिस्तानचं काही खरं नाही! "क़ुदरत का निज़ाम" त्यांच्या विरोधात, सेमी फायनल अवघड

पाकिस्तानचं काही खरं नाही! "क़ुदरत का निज़ाम" त्यांच्या विरोधात, सेमी फायनल अवघड

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC ODI World Cup 2023 Semi Final Scenario : भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका हे वर्ल्ड कप स्पर्धेचे तीन सेमी फायनलिस्ट ठरले आहेत. आता एका जागेसाठी न्यूझीलंड, पाकिस्तान व अफगाणिस्तान यांच्यात शर्यत आहे आणि उद्या याचा फैसला होऊन जाईल. गुरुवारी बंगळुरूच्या स्टेडियमवर न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका यांच्यात सामना होणार आहे. बंगळुरू येथे झालेल्या मागील लढतीत ४००+ धावा करूनही पावसाने खोडा घातला अन् पाकिस्तान डकवर्थ लुईस नियमानुसार २२ धावांनी जिंकला. त्यामुळे पाकिस्तान शर्यतीत कायम राहिला. तेव्हा "क़ुदरत का निज़ाम" म्हणून पाकिस्तानी फॅन्स सोशल मीडियावर सुटले... "क़ुदरत का निज़ाम" म्हणजे प्रकृती आपलं काम करत आहे... 


पण, आता समोर आलेल्या ताज्या बातमीनुसार "क़ुदरत का निज़ाम" हे पाकिस्तानच्या विरोधात जाणार आहे. न्यूझीलंड व श्रीलंका यांच्यातला सामना हा या दोन संघांसाठी जितका महत्त्वाचा आहे, तितकाच तो पाकिस्तानसाठीही आहे. न्यूझीलंडला उपांत्य फेरीतील चौथे स्थान पटकावण्यासाठी विजय हवा आहे, तर श्रीलंकेला २०२५च्या चॅम्पियन्स ट्रॉफीत ( पाकिस्तान) आपले स्थान पक्के करण्यासाठी जिंकायचे आहे. वर्ल्ड कप स्पर्धेतील अव्वल ८ संघ चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळू शकणार आहेत. श्रीलंका ४ गुणांसह सध्या आठव्या क्रमांकावर आहे. पण, नेदरलँड्सकडून त्यांना धोका आहे.

पाकिस्तानसाठी बॅड न्यूज
न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका यांच्यातला सामना आशियाई संघाने जिंकावा यासाठी पाकिस्तान दुवा करत आहेत. कारण न्यूझीलंड हरल्यास त्यांचा नेट रन रेट पडेल आणि पाकिस्तानला अखेरचा सामना जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश करता येईल. पण, न्यूझीलंडने उद्या विजय मिळवल्यास ते १० गुण व सरस नेट रन रेटसह आपले स्थान जवळपास पक्कं करतील. पाकिस्तानला मुसंडी मारण्यासाठी शेवटच्या साखळी सामन्यात १३० किंवा त्यापेक्षा अधिक धावांनी विजय मिळवावा लागेल. तर त्यांचा नेट रन रेट हा किवींपेक्षा सरस होईल आणि ते उपांत्य फेरीत जातील.


दुसरी शक्यता अशी की न्यूझीलंड व श्रीलंका यांच्यातला सामना पावसामुळे रद्द झाल्यासही पाकिस्तानला फायदा होईल. मग त्यांना शेवटची मॅच जिंकणे पुरेसे ठरेल. अफगाणिस्तानने शेवटचा सामना जिंकून १० गुण कमावले तरी त्यांचा नेट रन रेट हा पाकिस्तानपेक्षा कमीच राहील. पण, बंगळुरू येथे पाऊस पडण्याचा जो अंदाज व्यक्त केला जातोय, त्यावरून न्यूझीलंड व श्रीलंका सामना रद्द होण्याची शक्यता कमीच आहे. सामन्यादरम्यान तुरळक सरी पडून व्यत्यय येऊ शकतो. त्यामुळे कदाचित षटकं कमी केली जाऊ शकतात. त्यामुळे आता "क़ुदरत का निज़ाम" कोणाच्या बाजूने असेल हे पाहावे लागेल. 
 

Web Title: CWC23 : No spell of heavy rain predicted which means New Zealand vs Sri Lanka match will not be a washout, Pakistan semi final spot in danger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.