CWG 2022, Indian Women vs Australian Women : २४ वर्षांनंतर राष्ट्रकुल स्पर्धेत क्रिकेटचे पुनरागमन झाले आणि भारतीय महिलांनी दमदार सुरूवात केली. भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर ( Harmanpreet Kaur )हिने CWG2022 मध्ये अर्धशतक झळकावणाऱ्या पहिल्या खेळाडूचा मान पटकावला. शेफाली वर्मानेही ४८ धावांची वादळी खेळी केली. ऑस्ट्रेलियाची यष्टीरक्षक एलिसा हिली ( Alyssa Healy) हिने या सामन्यात मोठा विक्रम केला. तिने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये यष्टिंमागे १०० बळी टिपण्याचा पराक्रम करताना महेंद्रसिंग धोनीचा ( MS Dhoni) विक्रम मोडला. या फॉरमॅटमध्ये १०० बळी घेणारी ती पहिली खेळाडू ठरली.
स्मृती मानधना ( २४) व शेफाली यांनी चांगली सुरूवात करून दिली खरी, परंतु डार्सिए ब्राऊनने ही जोडी तोडली. यास्तिका भाटिया व शेफाली यांच्यातला ताळमेळ चुकला अन् ऑसींना आयती विकेट मिळाली. यास्तिका ८ धावांवर रन आऊट झाली. जेमिमान रॉड्रिक्सही ११ धावा करून बाद झाली. शेफाली ३३ चेंडूंत ९ चौकारांसह ४८ धावांवर माघारी परतल्यानंतर कर्णधार हरमनप्रीतने मोर्चा सांभाळला आणि इतिहास घडवला. तिने ३४ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारासह ५२ धावा केल्या. मिगन शटने तिची विकेट घेतली. भारताने ८ बाद १५४ धावा केल्या. इंग्लंडमधील ट्वेंटी-२० क्रिकेटमधील भारतीय महिलांची ही सर्वोत्तम खेळी ठरली. यापूर्वी त्यांनी २०२१मध्ये इंग्लंडविरुद्ध ६ बाद १५३ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाच्या जेस जॉनासेनने २२ धावांत ४ विकेट्स घेतल्या.
आजच्या दिवसाचे अन्य निकाल...
- #CWG2022 #TeamIndia टेबल टेनिस महिला सांघिक गट - भारताचा मनिका बात्राचा ११-५, ११-३, ११-२ असा दक्षिण आफ्रिकेच्या मुश्फीक कलामवर विजय
- #CWG2022 #Team India Lawn Bowls मध्ये भारताच्या तानिया चौधरीला १०-२१ अशा फरकाने स्कॉटलंडच्या डी हॉगनकडून पराभव पत्करावा लागला. पुरुष गटातही भारताला न्यूझीलंडकडून ६-२३ अशी हार मानावी लागली.
- Cycling Men's Team Pursuit गटात भारताने ४००० मीटर पात्रता स्पर्धेत ४:१२.८६५ सेकंदाची वेळ नोंदवली
- टेबल टेनिस महिला सांघिक गटात भारताची दणक्यात सुरूवात झाली. त्यांनी ३-० अशा फरकाने दक्षिण आफ्रिकेवर मात केली.
- #CWG 2022 Swimming Men's 100m Backstroke Heats: भारताच्या श्रीहरी नटराजने पात्रता फेरीत ५५.६८ सेकंदाची वेळ नोंदवरून पाचव्या स्थानासह उपांत्य फेरीत प्रवेश पक्का केला
Web Title: CWG 2022, INDW vs AUSW : Harmanpreet Kaur becomes the first female cricketer to score a fifty in Commonwealth Games, India set 155 runs target to Australia
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.