नागपूर : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान खेळली जात असलेली कसोटी मालिका रंगतदार होण्याची आशा व्यक्त केली. नागपूर क्रीडा पत्रकार संघटनेतर्फे (एसजेएएन) आयोजित २० व्या आंतर-प्रेस क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आलेले वेंगसरकर वार्तालाप कार्यक्रमात बोलत होते.वेंगसरकर म्हणाले, ‘केपटाऊनमध्ये खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ ‘बॅकफूट’वर असला तरी आता कामगिरीत सुधारणा करण्यास प्रयत्नशील राहील. सध्या या लढतीत उभय संघांना समान संधी आहे.’कर्नल या टोपणनावाने ओळखले जाणारे वेंगसरकर यांनी रणजी जेतेपद पटकावणाºया विदर्भ संघाची प्रशंसा केली. या कामगिरीचे श्रेय त्यांनी खेळाडंूनी घेतलेल्या मेहनतीसोबत व्हीसीए व प्रशिक्षकांना दिले.वेंगसरकर म्हणाले, ‘विदर्भाने साखळी फेरीत पंजाबविरुद्ध खेळल्या गेलेल्या सलामी लढतीपासून आपला निर्धार जाहीर केला होता. उपांत्य फेरीत विदर्भाने कर्नाटकसारख्या जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या गेलेल्या संघाचा पराभव केला.’वेंगसरकर यांनी विदर्भाला जेतेपद पटकावून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे खेळाडू यष्टिरक्षक फलंदाज अक्षयवाडकर, फिरकीपटू अक्षय वखरे आणि रजनीश गुरबानी यांची विशेष प्रशंसा केली.आगामी अंडर-१९ विश्वकप स्पर्धेत भारतीय संघाच्या शक्यतेबाबत बोलताना वेंगसरकर म्हणाले, ‘राहुल द्रविड संघाचा प्रशिक्षक आहे. त्याचा संघाला लाभ मिळेल. या स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी उल्लेखनीय ठरेल, अशी आशा आहे.’श्रीलंकेविरुद्ध भारतात खेळल्या गेलेल्या मालिकेची काही गरज नव्हती, असेही वेंगसरकर यांनी एका उत्तरात सांगितले. कारण काही महिन्यांपूर्वीच उभय संघांदरम्यान मालिका खेळली गेली होती. त्यामुळे भारतात पुन्हा त्याच देशाविरुद्ध मालिकेचे आयोजन करणे गरजेचे नव्हते. त्याऐवजी भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेत लवकर जायला हवे होते आणि तयारीसाठी काही सराव सामने खेळायला हवे होते, असेही वेंगसरकर म्हणाले.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- द. आफ्रिकेतील कामगिरीत नक्की सुधारणा होईल : दिलीप वेंगसरकर
द. आफ्रिकेतील कामगिरीत नक्की सुधारणा होईल : दिलीप वेंगसरकर
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान खेळली जात असलेली कसोटी मालिका रंगतदार होण्याची आशा व्यक्त केली.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2018 1:27 AM