Join us  

India Vs South Africa 2018 : विदेशात वर्चस्वाची संधी

भारतीय उपखंडात वर्चस्व गाजविणाºया भारतीय संघाचा द. आफ्रिका दौरा शुक्रवारपासून पहिल्या कसोटीने सुरू होत आहे. स्थानिक मैदानावर सलग १२ कसोटी जिंकणाºया भारताला विदेशातही आम्ही ‘शेर’च आहोत, हे सिद्ध करण्याचे आव्हान असेल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 1:23 AM

Open in App

केपटाऊन - भारतीय उपखंडात वर्चस्व गाजविणाºया भारतीय संघाचा द. आफ्रिका दौरा शुक्रवारपासून पहिल्या कसोटीने सुरू होत आहे. स्थानिक मैदानावर सलग १२ कसोटी जिंकणाºया भारताला विदेशातही आम्ही ‘शेर’च आहोत, हे सिद्ध करण्याचे आव्हान असेल.२०१८-१९च्या कडव्या मोसमाची सुरुवात द. आफ्रिकेविरुद्ध तीन कसोट्यांद्वारे होत आहे. त्यानंतर इंग्लंड आणि आॅस्ट्रेलियाचा दौरा असेल. हे सत्र कर्णधार विराट कोहली आणि सहकाºयांसाठी महत्त्वाचे आहे. ‘घरचे शेर विदेशात ढेर’ हा समज चुकीचा ठरवून कामगिरी सुधारण्यासाठी झुंज द्यावी लागेल. भारताचे यश वेगवान माºयावर बºयाच अंशी विसंबून आहे. रँकिंगमध्ये भारताने द. आफ्रिकेवर वर्चस्व गाजविले आहे. संघाने ०-३ ने मालिका गमावली, तरीही हे स्थान अबाधित राहील. कोहलीच्या संघासाठी मात्र केवळ आकडे आणि रँकिंग महत्त्वाचे नाही.यजमान द. आफ्रिका संघ भारताचा बलाढ्य फलंदाजी क्रम कोसळविण्यास सज्ज आहे. त्यासाठी वेगवान मारा तयार ठेवण्यात आला असून, भारतीय संघाने हे आव्हान परतविण्यास कंबर कसली आहे. मागील दोन दौºयांत भारताने आफ्रिकेत चांगली कामगिरी केली. २०१०मध्ये मालिका बरोबरीत सोडविली, तर २०१३-१४मध्ये कडव्या संघर्षात भारताचा पराभव झाला. त्या संघातील १३ खेळाडू सध्याच्या संघात आहेत. या सर्वांना मोठा अनुभव असून, अनेक विजयांत त्यांनी योगदान दिले आहे.न्यू लँड्समध्ये संघ ४ कसोटी खेळला. यांपैकी २ सामने गमविले, तर २ अनिर्णीत राखण्यात संघाला यश आले. कोहली द. आफ्रिकेत उद्या केवळ तिसरी कसोटी खेळेल; पण जमेची बाब अशी, की वेगवान मारा बलाढ्य असल्याने प्रतिस्पर्धी संघाला चीत करू शकतो. येथे हिरवीगार खेळपट्टी आहे. भारत येथे ३ वेगवान गोलंदाज आणि २ फिरकीपटूंना संधी देईल, असा अंदाज आहे. जडेजाचे स्थान आश्विनला मिळेल. रोहित हा अतिरिक्त फलंदाज, तर हार्दिक अष्टपैलू खेळाडू असेल. सलामीला शिखर धवन आणि मुरली विजय आल्यास लोकेश राहुलला बाहेर बसावे लागेल. (वृत्तसंस्था)भारत व आफ्रिका यांच्यात आतापर्यंत ३३ कसोटी सामने झाले आहेत यामध्ये भारताने १० तर आफ्रिकेने १३ जिंकले आहेत. १० सामने अनिर्णीत राहिले आहेत.आफ्रिकेत खराब रेकॉर्ड...भारताने ओळीने नऊ मालिका जिंकल्या आहेत. त्यातील सहा मालिका विदेशात जिंकल्या. त्याआधी २०१४-१५ ला आॅस्ट्रेलियात मालिका गमावली. द. आफ्रिकेत मात्र भारताचा रेकॉर्ड खराब आहे. सहापैकी पाच मालिका भारताने गमविल्या असून एक मालिका अनिर्णीत राखण्यात यश आले होते. भारताने १९९२ पासून द. आफ्रिका दौºयात १७ कसोटींपैकी केवळ दोन सामने जिंकले. यापैकी २००६-०७ ला राहुल द्रविडच्या आणि २०१०-११ ला महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात प्रत्येकी एक विजय नोंदविला आहे.भारतासोबत हिशेब चुकता करायचा आहे : डू प्लेसिसदक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फॅफ डू प्लेसिसने भारतविरुद्ध बहुप्रतीक्षित कसोटी सामन्यापूर्वी शाब्दिक युद्धाला प्रारंभ करताना जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या संघाविरुद्ध हिशेब चुकता करायचा असल्याचे म्हटले आहे. भारतात २०१५ मध्ये पत्करावा लागलेल्या ३-० पराभवाचा उल्लेख करताना डू प्लेसिसने याची परतफेड करण्यास संघ उत्सुक असल्याचे म्हटले आहे.डू प्लेसिसने सांगितले, ‘भारताविरुद्ध भविष्यात केव्हा कसोटी मालिका खेळली जाईल, याची मला कल्पना नाही. त्यामुळे सर्व सिनिअर खेळाडूंसाठी भारताविरुद्ध खेळण्याची कदाचित ही अखेरची संधी आहे आणि दक्षिण आफ्रिकेत मालिका खेळण्यापेक्षा दुसरे काय चांगले असू शकते.आम्ही यापूर्वी भारत दौ-यावर गेलो होतो,त्यावेळी कामगिरी निराशाजनक झाली होती. त्यामुळे आम्ही शुक्रवारपासून प्रारंभ होणाºया मालिकेबाबत उत्सुक आहोत.’डू प्लेसिस पुढे म्हणाला,‘न्यूलँड््सच्याखेळपट्टीवर हिरवळ असून त्याचा यजमानसंघाला लाभ मिळेल. मैदानातील कर्मचाºयांनी उष्ण वातावरणानंतरही आपली भूमिका चोख बजावली. खेळपट्टी चांगली भासत आहे.सामनास्थळ : न्यू लँड्स, केपटाऊन,वेळ : दुपारी २ पासून (भारतीय वेळेनुसार)उभय संघ यातून निवडणारभारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मुरली विजय, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, रिद्धिमान साहा, हार्दिक पंड्या, आर. आश्विन, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, ईशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह व पार्थिव पटेल.दक्षिण आफ्रिका : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), डीन एल्गर, एडेन मार्कराम, हाशिम अमला, तेम्बा बावुमा, थ्यूनिस डि ब्रुएन, क्विंटन डीकॉक, केशव महाराज, मोर्ने मोर्केल, डेल स्टेन, ख्रिस मॉरिस, व्हर्नान फिलॅन्डर, कागिसो रबाडा आणि अँडिले फेहलुकवाओ.भारतीय संघाची सरावाला तर कोहलीची पत्रकार परिषदेला दांडीभारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रारंभ होणाºया पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी गुरुवारी ऐच्छिक सराव सत्र टाळले तर कर्णधार विराट कोहलीनेही सामन्याच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. त्याच्या स्थानी भारतीय संघाचे सहायक प्रशिक्षक संजय बांगर एक तास उशिरा मीडियासोबत बातचित करण्यासाठी आले.त्याआधी, संघ व्यवस्थापनाने सकाळी कसोटी पूर्वीचे सराव सत्र ऐच्छिक असल्याचे जाहीर केले. एकाही खेळाडूने सराव केला नाही, याचे आश्चर्य वाटले. केपटाऊन कसोटीत न खेळणारे खेळाडूही सरावात सहभागी झाले नाही. केवळ सपोर्ट स्टाफमध्ये प्रशिक्षक रवी शास्त्री आणि निवड समिती प्रमुख एम.एस. के. प्रसाद खेळपट्टी बघण्यासाठी आले.संघ व्यवस्थापनातील एका सूत्राने सांगितले की, याला अधिक महत्त्व देण्याची गरज नाही. कोहली पत्रकार परिषदेला न पोहोचणे सर्वाधिक आश्चर्यचकित करणारी बाब होती. कुठल्याही मालिकेला प्रारंभ होण्यासाठी उभय संघाचे कर्णधार पत्रकार परिषदेत सहभागी होण्याची पद्धत आहे.महेंद्रसिंह धोनीने एकदाही पत्रकार परिषद सोडली नाही. विशेषत: विदेश दौºयात. कोहली श्रीलंका व वेस्ट इंडिजमध्ये सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत सहभागी झाला होता.वेगवान गोलंदाजांनी खेळपट्टीला आश्विनसाठी अनुकूल बनवावे : सचिननवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेला फिरकी गोलंदाजांसाठी खेळपट्टी तयार करण्याविषयी ओळखले जात नाही आणि त्यामुळेच तेंडुलकरने २०१०-११ साली झालेल्या दौºयात झहीर खानने केले होते त्याप्रमाणेच आता भारतीय संघातील वेगवान गोलंदाजांनी न्यूलँड्सची खेळपट्टी आश्विनसाठी अनुकूल बनवायला हवी, असे म्हटले आहे.केपटाऊन येथे उद्यापासून पहिला कसोटी सामना खेळवला जाणार आहे आणि झहीर खानच्या नेतृत्वाखालील वेगवान गोलंदाजी आक्रमणाने कशा प्रकारे खेळपट्टीला हरभजनसाठी अनुकूल केली होती याची आठवण सचिनने दिली.तेंडुलकरने म्हटले, २०१०-११ दरम्यान केपटाऊन कसोटीत हरभजनने दुसºया डावात ७ गडी बाद केले होते. झहीर आणि लोनवाबो सातेसोबे हे दोघेही डावखुरे वेगवान गोलंदाज होते आणि या दोघांनी खेळपट्टीला रफ केले होते.इशांत आणि श्रीसंतनेदेखील राऊंड द विकेट गोलंदाजी केली. त्यानंतर जेव्हा भज्जीने उजव्या हाताच्या फलंदाजांना गोलंदाजी केली तेव्हा खेळपट्टीवरील रफ झालेल्या जागेमुळे त्याला मदत मिळाली. याचीच पुनरावृत्ती सध्याच्या वेगवान गोलंदाजांनी करावी, असे सचिनला वाटते.

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८भारतीय क्रिकेट संघद. आफ्रिका