पाकिस्तान सुपर लीग ( PSL 2021) स्थगित करण्याचा निर्णय गुरुवारी घेतला गेला. लीगमधील सहा खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे हा निर्णय घेतला गेला. 20 फेब्रुवारीपासून PSLला सुरुवात झाली आणि 34 सामन्यांपैकी आतापर्यंत 14 सामनेच झाले आहेत. पीएसएल स्थगित झाल्यानंतर पाकिस्तानी खेळाडू व फॅन्स दूखी झाले आहेत. त्यात पाकिस्तानचा खेळाडू व PSLमध्ये इस्लामाबाद यूनायडेट खेळणाऱ्या शादाब खान ( Shadab Khan) आणि हसन अली ( Hasan Ali) यांनी केलेल्या ट्विटनंतर दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज डेल स्टेन ( Dale Steyn) ट्रोल होऊ लागला. भारतीयांनी तर पाकिस्तानच्या खेळाडूंची चांगलीच फिरकी घेतली.
शादाबनं ट्विट केलं की, या अल्लाह, हमारे पिएसएल को किसकी नजर लगा दी.
हसन अली यानं ट्विट केलं की, नजर लग गई हमारी PSL को.
नेटिझन्सनी घेतली शाळा
डेल स्टेनची माफी
त्यानं ट्विट केलं की,''माझ्यासह अनेक खेळाडूंच्या कारकिर्दीत आयपीएलचे महत्त्व अधिक आहे. मला कोणत्याही लीगची बदनामी करायची नव्हती किंवा तुलना करायची नव्हती. सोशल मीडिया आणि माझ्या वाक्यातून तसे ते भासवण्यात आली. तरीही माझ्यामुळे कुणी दुखावले गेले असेल तर त्यांची मी माफी मागतो.''
काय म्हणाला डेल स्टेन?
एक्स्प्रेस ट्रीबूनशी बोलताना त्यानं आयपीएलच्या १४व्या पर्वातून माघार घेण्यामागचं कारण सांगितले. तो म्हणाला,'' मला काही काळ विश्रांती हवी होती. पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळणं हे अन्य फ्रँचायझी लीगपेक्षा एक खेळाडू म्हणून अधिक फायद्याचे आहे. आयपीएलमध्ये खेळताना मोठा चमू असतो, मोठी नावं असतात, खेळाडूंसाठी मोजलेल्या पैशांवर अधिक भर दिला जातो आणि अशात क्रिकेट कुठेतरी मागे पडतं.''
''पाकिस्तान सुपर लीग किंवा श्रीलंकन प्रीमिअर लीगमध्ये क्रिकेटला अधिक महत्त्व दिले जाते. मला इथे येऊन थोडेच दिवस झाले आहेत आणि इथे भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तिला फक्त क्रिकेटबद्दल जाणून घ्यायचं असतं. आयपीएलमध्ये मी हे सर्व विसरतो आणि आयपीएलमध्ये यंदा किती पैसा मिळणार, हाच एक प्रमुख मुद्दा चर्चिला जातो,'' असेही स्टेन म्हणाला.
Web Title: Dale Steyn has been trolled by fans on twitter following the postponement of the pakistan super league 2021
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.