T20 World Cup 2022: ...म्हणून जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद शमीला घ्यायला हवं; डेल स्टेनचं मोठं वक्तव्य

भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह टी-20 विश्वचषकातून बाहेर झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 07:49 PM2022-10-10T19:49:46+5:302022-10-10T19:51:00+5:30

whatsapp join usJoin us
Dale Steyn said that Mohammad Shami has the ability to swing, so he should be replaced on Jasprit Bumrah place  | T20 World Cup 2022: ...म्हणून जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद शमीला घ्यायला हवं; डेल स्टेनचं मोठं वक्तव्य

T20 World Cup 2022: ...म्हणून जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद शमीला घ्यायला हवं; डेल स्टेनचं मोठं वक्तव्य

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह टी-20 विश्वचषकातून बाहेर झाला आहे. मात्र या स्पर्धेसाठी जसप्रीत बुमराहच्या जागी खेळाडूची घोषणा अद्याप झालेली नाही. खंर तर जसप्रीत बुमराहच्या जागी आगामी विश्वचषकासाठी मोहम्मद शमी आणि दीपक चहर यांची नावे आघाडीवर आहेत. सध्या भारताचा विश्वचषकाचा संघ ऑस्ट्रेलियात पोहोचला आहे, मात्र मोहम्मद शमी आणि दीपक चहर हे 15 सदस्यीय भारतीय संघात नाहीत. मात्र दोन्ही खेळाडू राखीव खेळाडू म्हणून संघासोबत असणार आहेत. अशा स्थितीत असे मानले जात आहे की मोहम्मद शमी आणि दीपक चहर 12 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाला रवाना होऊ शकतात.

बुमराहच्या जागी मोहम्मद शमीला घ्यायला हवं - स्टेन 
दरम्यान, दीपक चहर दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर झाला आहे. आता दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेनने 2022 च्या टी-20 विश्वचषकासाठी जसप्रीत बुमराहच्या बदलीबाबत एक मोठे वक्तव्य केले आहे. स्टार स्पोर्ट्सच्या क्रिकेट लाईव्ह या शोमध्ये बोलताना स्टेनने म्हटले, "मोहम्मद शमी फिट असेल तर त्याला जसप्रीत बुमराहच्या जागी संघात घ्यायला हवे. मोहम्मद शमीकडे अनुभव आहे, याशिवाय तो परिस्थितीनुसार गोलंदाजी करू शकतो. तसेच मोहम्मद शमीमध्ये त्याच्या शानदार वेगामुळे चेंडू आत आणि बाहेर स्विंग करण्याची क्षमता आहे. यामुळे जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद शमीचा समावेश करण्यात यावा."

मोहम्मद शमीचे होणार पुनरागमन? 
लक्षणीय बाब म्हणजे मोहम्मद शमीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत पुनरागमन केले होते. मात्र कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे तो खेळू शकला नव्हता, परंतु आता मोहम्मद शमी कोरोना विषाणूच्या संसर्गातून बरा झाल्यानंतर सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये फिटनेसवर काम करत आहे. अद्याप मोहम्मद शमीला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या वैद्यकीय कक्षाकडून मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे मोहम्मद शमी भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलियाला जाऊ शकला नाही. मात्र 12 ऑक्टोबरला तो ऑस्ट्रेलियाला रवाना होऊ शकतो अशी आशा वर्तवली जात आहे. 

टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ 
रोहित शर्मा (कर्णधार), के.एल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, आर अश्विन, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग.

राखीव खेळाडू - मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर. 

भारतीय संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील वेळापत्रक
23 ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, 1.30 वाजल्यापासून, मेलबर्न
27 ऑक्टोबर - भारत वि. A गटातील उपविजेता, 12.30 वाजल्यापासून, सिडनी
30 ऑक्टोबर - भारत वि. दक्षिण आफ्रिका, 4.30 वाजल्यापासून, पर्थ
2 नोव्हेंबर - भारत. वि. बांगलादेश, 1.30 वाजल्यापासून, एडलेड
6 नोव्हेंबर - भारत वि. B गटातील विजेता, 1.30 वाजल्यापासून, मेलबर्न
13 नोव्हेंबरला अंतिम सामना 

सर्व महत्त्वाच्या घडामोडींसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल क्रमांकाची मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Dale Steyn said that Mohammad Shami has the ability to swing, so he should be replaced on Jasprit Bumrah place 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.