Big Bash League : बिग बॅश लीगमध्ये शनिवारी वादळी खेळी पाहायला मिळाली. सिडनी थंडर्स विरुद्ध मेलबर्न रेनेगेड्स यांच्यातला सामना एकतर्फी झाला. सिडनी थंडर्सनं १२९ धावांनी मोठा विजय मिळवला. सिडनी थंडर्सच्या ७ बाद २०९ धावांचा पाठलाग करताना मेलबर्नचा डावा ८० धावांत गडगडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियन खेळाडू डॅनिएल सॅम्सनं ( Daniel Sams) तुफान फटकेबाजी केली. ९व्या षटकात फलंदाजाली मैदानावर आलेल्या डॅनिएलनं नाबाद ९८ धावांची खेळी केली. यापैकी ७६ धावा या केवळ १५ चेंडूंत त्यानं कुटल्या. त्यानंतर गोलंदाजीतही एक विकेट घेत त्यानं संघाला मोठा विजय मिळवून दिला.
प्रथम फलंदाजीला आलेल्या थंडर्सनं ७ बाग २०९ धावा केल्या. मॅथ्यू जाईल्क्स ( १०) व कर्णधार जेसन संघा ( २१) माघारी परतल्यानंतर अॅलेक्स हेल्स व डॅनिएल यांनी खिंड लढवली. हेल्स २८ चेंडूंत ३ चौकार व ५ षटकार खेचून ६३ धावांवर माघारी परतला. त्यानंतर थंडर्सच्या फलंदाजांनी रांग लावली, परंतु डॅनिएल एका बाजूनं खिंड लढवत होता. त्यानं ४४ चेंडूंत ७ चौकार व ८ षटकारांसह नाबाद ९८ धावा केल्या. त्यानं एकट्यानं अखेरपर्यंत संघर्ष केला. मेलबर्नच्या केन रिचर्डसननं दोन विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरात मेलबर्नच्या खेळाडूंनी शरणागती पत्करली. जेम्स सेयमोर ( २५) हा त्यांच्याकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्यांचा निम्मा संघ ३८ धावांवर माघारी परतला होता. उर्वरीत संघ ४२ धावांची भर घालू शकला. मोहम्मद हस्नैन यानं २२ धावांत ३ विकेट्स घेतल्या. तन्वीर संघानं दोन विकेट्स घेतल्या.
Web Title: Daniel Sams, came in the 9th over and smashed unbeaten 98 runs from just 44 balls including 6 fours and 8 sixes in BBL
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.