Danish Kaneria On Ram Mandir: अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या मंदिराचे उद्घाटन आणि रामललाची प्राणप्रतिष्ठा येत्या 22 जानेवारी रोजी होणार आहे. तत्पूर्वी, पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया (Danish Kaneria) याने अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या राम मंदिरासंदर्भात सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली आहे.
दानिश कनेरियाने एस्वर पोस्ट केली की, "आपले राजा श्रीरामचे भव्य मंदिर तयार आहे. आता फक्त 8 दिवस उरले आहेत. बोला जय जय श्री राम..." असा नाराही दानिशने आपल्या पोस्टमध्ये दिला. या पोस्टसोबत स्वतःचा एक फोटोही शेअर केला आहे. या छायाचित्रात तो भगवा झेंडा घेऊन उभा आहे. या ध्वजात रामाचे चित्र आणि मंदिर आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केली जात आहे.
विशेष म्हणजे, दानिश कनेरिया हा प्रसिद्ध पाकिस्तानी हिंदू क्रिकेटर आहे. त्याचा जन्म कराची येथे झाला आणि 2000 ते 2010 दरम्यान तो पाकिस्तान क्रिकेट संघाकडून खेळला. तो संघाचा मुख्य फिरकी गोलंदाज होता. त्याच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये 250 हून अधिक विकेट्स आहेत.
भारताच्या बाजूने विधाने दानिश कनेरिया पाकिस्तान क्रिकेट संघात आपल्यासोबत होणाऱ्या भेदभावाबाबत अनेकवेळा सार्वजनिक मंचांवर वक्तव्ये करत असतो. तसेच, त्याने अनेकदा भारताच्या समर्थनार्थ वक्तव्ये केली आहेत. अलीकडेच मालदीव आणि भारत यांच्यातील वादावर त्याने पोस्ट केली होती. दानिश गेल्या काही काळापासून सातत्याने पीएम मोदींची स्तुती करत आहे.