श्रीलंकेचा आघाडीचा फलंदाज दनुष्का गुणतिलकाला बलात्काराच्या प्रकरणात सिडनी पोलिसांनी अटक केली. या अटकेमुळे टी २० वर्ल्डकपमध्ये खळबळ उडाली. श्रीलंकेच्या टीमने शनिवारी इंग्लंडविरोधात वर्ल्डकपमधील अखेरचा सामना खेळला होता. या मॅचनंतर काही वेळातच पोलिसांनी गुणतीलकाला अटक केली. आता या प्रकरणात महिलेने अनेक खुलासे केले आहेत. (Danushka Gunathilaka Rape Case)
या प्रकरणात आता नवा खुलासा समोर आला आहे, गुणतिलकाने महिलेवर अनेकवेळा बलात्कार केला आहे. त्याने महिलेला मारहाणही केल्याचे तसेच गळा दाबण्याचाही प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणानंतर महिलेने मेंदूचे स्कॅनही केले आहे.
या प्रकरणातील बातम्या ऑस्ट्रेलियाच्या माध्यमात आल्या आहेत. त्यानुसार, गुनातिलका याच्यावर लैंगिक अत्याचाराचे चार गुन्हे दाखल आहेत. न्यायालयाने त्याला जामीन देण्यास नकार दिला आहे. मॅजिस्ट्रेट रॉबर्ट विल्यम्स यांनी आदेश जारी करताना आरोपांची गंभीरता कमी करण्याचे मान्य केले होते, पण ऑस्ट्रेलियन मीडियाने या आदेशाला आव्हान दिले. त्यामुळे या महिलेवर अत्याचार झाल्याची माहिती समोर आली आहे.
Breaking : दानुष्का गुणथिलकाचे हे वर्ष जेलमध्येच जाणार! सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून हकालपट्टी
सिडनीच्या ऑपेरा हाऊसजवळील एका बारमध्ये २ नोव्हेंबर रोजी भेटण्यापूर्वी दोघांची डेटिंग अॅपवर ओखळ झाली होती, असं यात म्हटले आहे. त्यानंतर तो पीडितेच्या घरी गेला आणि तिथे दारू पाजल्यानंतर गुणतिलकाने महिलेवर जबरदस्ती केली.
गुणतिलकाला सिडनीत अटक केल्यानंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डाने त्याला सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निलंबित केले आहे. गुणतिलका याच्यावर अशी कारवाई करण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी २०१८ मध्येही तो अशाच एका प्रकरणात अडकला होता. त्यावेळी श्रीलंकन क्रिकेटने त्याला निलंबित केले होते. त्यावेळी एका नॉर्वेजियन महिलेने गुणतिलकाला आणि तिच्या एका मैत्रिणीवर बलात्काराचा आरोप केला होता. पण, चौकशीनंतर गुणतिलकाची निर्दोष मुक्तता करण्यात आली. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषकासाठी श्रीलंकन संघातील गुणतिलकाला दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर ठेवण्यात आले होते. (Danushka Gunathilaka Rape Case)