Join us  

Danushka Gunathilaka Rape Case : डेटिंग अ‍ॅपवर ओळख, मग रूममध्ये बलात्कार! श्रीलंकन खेळाडूचा ऑस्ट्रेलियात प्रताप; जाणून घ्या डिटेल्स

श्रीलंकेचा आघाडीचा फलंदाज दनुष्का गुणतीलकाला बलात्काराच्या प्रकरणात सिडनी पोलिसांनी अटक केल्याने टी २० वर्ल्डकपमध्ये खळबळ उडाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2022 12:30 PM

Open in App

श्रीलंकेचा आघाडीचा फलंदाज दनुष्का गुणतीलकाला बलात्काराच्या प्रकरणात सिडनी पोलिसांनी अटक केल्याने टी २० वर्ल्डकपमध्ये खळबळ उडाली आहे. श्रीलंकेच्या टीमने शनिवारी इंग्लंडविरोधात वर्ल्डकपमधील अखेरचा सामना खेळला होता. या मॅचनंतर काही वेळातच पोलिसांनी गुणतीलकाला अटक केली. या प्रकरणामुळे आता क्रिकेट जगतात गोंधळ उडाला आहे.  

या प्रकरणी आता ऑस्ट्रेलिया पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. ३१ वर्षाच्या दनुष्काने ऑस्ट्रेलियातील २९ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. या महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दनुष्कासाठी जामिनाचा अर्ज दाखल केला होता. पण, कोर्टाने जामीन नाकारला आहे. (Danushka Gunathilaka Rape Case )

Danushka Gunathilaka Arrested: इंग्लंडविरुद्ध मॅच संपताच श्रीलंकेच्या फलंदाजाला अटक; सिडनीत बलात्काराचा आरोप

या प्रकरणी पोलिसांनी दिलेली माहीत अशी, दनुष्क आणि या महिलेची ओळख एका ऑनलाईन डेटींग अॅपवर झाली. या दोघांनी एका हॉटेलमध्ये भेटायचे ठरवले. २ नोव्हेंबर रोजी त्याने या महिलेला हॉटेलमधील एका रुममध्ये भेटायला बोलवले. आणि तिथे जबरदस्ती बलात्कार केल्याचा आरोप त्या महिलेने केला आहे.  

पोलिसांनी तपासानंतर दनुष्काला अटक केली आहे.तपासादरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्ही तापासले आहेत. सिडनी येथील ससेक्स स्ट्रीट हॉटेलमधून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी दनुष्काला कस्टडीमध्ये ठेवले असून त्याच्या जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता.पण, जामीन नाकारण्यात आला आहे.

श्रीलंका क्रिकेट बोर्डाने अटकेच्या बातमीला दुजोरा दिला आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्ड या संपूर्ण प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. आयसीसीच्याही संपर्कात आहे. 

३१ वर्षीय दानुष्का या T20 विश्वचषकात फक्त एकच सामना खेळला, तो नामिबियाविरुद्ध मैदानात उतरला. त्यानंतर तो दुखापतीमुळे टी-२० वर्ल्ड कपमधून बाहेर पडला होता. मात्र, तो श्रीलंकेला न जाता ऑस्ट्रेलियामध्येच थांबला. 

दनुष्काने २०१५ मध्ये श्रीलंका टीममध्ये पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत ८ कसोटी सामने, ४७ एकदिवसीय आणि ४६ टी-20 सामने खेळले आहेत. श्रीलंका T20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडली आहे. (Danushka Gunathilaka Rape Case )

टॅग्स :श्रीलंकाआॅस्ट्रेलियापोलिस
Open in App