वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार डॅरेन सॅमीनं काही दिवसांपूर्वी सनरायझर्स हैदराबाद संघाच्या सहकाऱ्यांवर वर्णद्वेषाचे आरोप केले होते. इंडियन प्रीमिअर लीगमधील ( आयपीएल ) संघातील सहकारी 'कालू' म्हणून हाक मारायचे आणि त्याच्या अर्थ वर्णद्वेषी असल्याचा आरोप सॅमीनं नुकताच केला होता. त्यानंतर ख्रिस गेल, डॅरेन ब्राव्हो आदी खेळाडूंनीही सॅमीला पाठींबा दर्शविला होता. सॅमीने तर भारतीय खेळाडूंनी स्वतःहून पुढे येण्याची धमकी दिली होती. पण, गुरुवारी अचानक त्यानं हे आरोप मागे घेतले. कालू या शब्दाचा अर्थ उमगल्याचा दावा त्यानं केला.
चला करूया सचिन तेंडुलकरच्या BKC येथील आलिशान अपार्टमेंटची सफर!
सॅमीनं दोन दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करून भारतीय खेळाडूंना धमकी दिली होती. तो म्हणाला होती की,''मी जगभरात अनेक लीगमध्ये खेळलो आणि मला लोकांनी भरभरून प्रेम दिलं. अनेक खेळाडूंसोबत ड्रेसिंग रुम शेअर केला आहे. पण, जेव्हा मला त्या शब्दाचा अर्थ समजला, तेव्हा मला राग अनावर झाला. सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळताना मला त्या शब्दानं खेळाडू बोलवत होते. त्या शब्दानं कृष्णवर्णीयांचा अपमान होतो, हे मला आता समजले.''
जगातील सर्वात श्रीमंत WWE सुपरस्टार; कमाई ऐकून व्हाल थक्क!
त्या नावानं सतत बोलावलं जायचं आणि सहकारी हसायचे, असेही तो म्हणाला होता.''मला त्या नावानं हाक मारणाऱ्या प्रत्येकाला मी मॅसेज केला आहे. तुम्ही मला त्या नावानं बोलवायचा, तेव्हा त्याचा अर्थ हा घट्ट नातं असं असेल मला वाटायचे. मला त्याचा अर्थ माहीत नव्हता. तुम्ही माझा अपमान करत होता. मी तुम्हाला मॅसेज केला आहे. मला तुम्ही नक्की कोणत्या हेतूनं त्या नावानं बोलवायचा? त्यामुळे मला उत्तर द्या. जर तुम्ही अनादर करत असाल, तर मला खूप वाईट वाटेल,''असेही त्यानं स्पष्ट केलं होतं.
आता Wide बॉलवर मिळणार फ्री हिट; ट्वेंटी-20 सामन्यात दोन पॉवर प्ले!
त्यानंतर सनरायझर्स हैदाराबादच्या माजी सहकाऱ्यानं सॅमीला कालू कोणत्या अर्थानं म्हणायचो, हे समजावले. त्यानंतर सॅमीनं ट्विट केलं की,''या संदर्भात मी एका व्यक्तीशी सकारात्मक चर्चा केली आणि त्याच्या उत्तरानं माझं समाधान झालं आहे. नकारात्मकता पसरवण्यापेक्षा लोकांना सुशिक्षित करण्यावर भर द्यायला हवा. प्रेमानं कालू म्हणत असल्याचं त्यानं मला सांगितलं आणि मी त्याच्यावर विश्वास ठेवला आहे.''