जॉर्ज फ्लॉयड याच्या निधनानंतर वर्णद्वेषाविरोधातील आंदोलन क्षमण्याचं नाव घेत नाही. क्रिकेटपटू डॅरेन सॅमी, ख्रिस गेल आणि डॅरेन ब्राव्हो यांनीही वर्णद्वेषाविरोधात परखड मत मांडलं. सॅमीनं क्रिकेटमध्येही असे प्रकार घडत असल्याचा आरोप करताना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला ( आयसीसी) यावर कारवाई करण्याची विनंती केली होती. पण, आता सॅमीनं थेट आयसीसीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. त्यानं अप्रत्यक्षरित्या आयसीसीवर टीका केली. बाऊंसरचा नियम आणून आयसीसीनं नियोजित कटानं वेस्ट इंडिज क्रिकेटची मक्तेदारी संपवली, असा आरोप त्यानं केला.
वेस्ट इंडिज क्रिकेटपटूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर एक काळ गाजवला. त्यांनी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचे पहिली दोन जेतेपद नावावर केली. 1983मध्ये भारताने त्यांना रोखले. कर्टनी वॉल्श, जोएब गार्नर, पॅट्रीक पॅटरसन, अँडी रॉबर्ट, मायकेल होल्डींग आदी गोलंदाजांनी 19व्या शतकात वेस्ट इंडिजचा दबदबा निर्माण केला होता. त्यांच्या गोलंदाजीच्या माऱ्यासमोर भलेभले फलंदाज चाचपडत होते.
1991मध्ये एका षटकात केवळ एकच बाऊंसर टाकण्याचा नियम आणला, तर 1994मध्ये दोन बाऊंसरची मुभा दिली. 2001मध्ये पुन्हा त्यात बदल करून एक बाऊंसरचा नियम आणला. 11 वर्षांनंतर पुन्हा दोन बाऊंसरचा नियम आणला. त्यावर बोलताना सॅमी
म्हणाला,''आयसीसीनं 1991मध्ये बाऊंसरचा नियम आणून वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांची मक्तेदारी संपुष्टात आणली. तेव्हा वेस्ट इंडिजचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वर्चस्व होते आणि त्यानंतर बाऊंसरचा नियम आणला. आमची मक्तेदारी संपुष्टात आणण्याची ती सुरुवात होती. मी कदाचित चुकीचा असू शकतो, पण त्याकडे मी असं पाहतो.''
याआधी सॅमीनं इंडियन प्रीमिअर लीगमधील सनरायझर्स हैदराबाद संघातील सहकाऱ्यांवर वर्णद्वेषाचे आरोप केले होते.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
India-China बॉर्डरवरच्या भारतीय जवानाची देशवासीयांना साद; 30 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला Video
मोहम्मद हाफिजच्या बंडानंतर पाकिस्तान क्रिकेट मंडळाचं डोकं टाळ्यावर; घेतला मोठा निर्णय
वर्ल्ड कपमधील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी घडलं होतं असं काहीतरी...; विजय शंकरचा मोठा खुलासा
आता मोदी सरकार कच्चं तेल इराककडून खरेदी करणार नाही, तर...; जितेंद्र आव्हाडांचा टोला
वेस्ट इंडिजच्या कर्णधाराचे टी 10लीगमध्ये धडाकेबाज शतक, युवराज सिंगचा विक्रम थोडक्यात वाचला
'ती' विनंती अमान्य; पाकिस्तान क्रिकेट मंडळाचा BCCIला दणका, IPL 2020वर संकट!