Join us

IPL 2023 : केन विल्यमसनच्या जागी स्फोटक फलंदाज GTच्या संघात; भारतीय गोलंदाजांचीही केलीय धुलाई 

IPL 2023 : इंडियन प्रीमियर लीगमध्ये गुजरात टायटन्सला पहिल्याच सामन्यात केन विल्यमसन दुखापतग्रस्त झाल्याने मोठा धक्का बसला होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2023 21:46 IST

Open in App

IPL 2023 : इंडियन प्रीमियर लीगमध्ये गुजरात टायटन्सला पहिल्याच सामन्यात केन विल्यमसन दुखापतग्रस्त झाल्याने मोठा धक्का बसला होता. विल्यमसनची दुखापत गंभीर असल्याचे त्याने स्पर्धेतून माघार घेतली. गुजरातने या खेळाडूच्या बदलीची घोषणा केली आहे. गुजरातने केनच्या जागी श्रीलंकेचा फलंदाज दासुन शनाकाचा ( Dasun Shanaka) संघात समावेश केला आहे.

शनाका हा श्रीलंकेचा मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार असून तो मधल्या फळीचा धोकादायक फलंदाज आहे. दासून  गोलंदाजीही करतो. भारताविरुद्ध नुकत्याच संपलेल्या ट्वेंटी-२० मालिकेत शनाकाने आपल्या बॅटची ताकद दाखवून दिली. त्याने ३ डावात १८७ च्या स्ट्राईक रेटने आणि ६२ च्या सरासरीने १२४ धावा केल्या होत्या. त्याचबरोबर वन डे मालिकेत त्याने ३ डावात १२१ धावा केल्या होत्या. आयपीएलमध्ये प्रथमच ५० लाखांच्या मूळ किमतीत तो सहभागी झाला आहे. 

शनाकाने १८१ ट्वेंटी-२० सामन्यांत ३७०२ धावा केल्या आहेत आणि ५९ बळी घेतले आहेत. विल्यमसनला चेन्नईविरुद्धच्या पहिल्या सामन्यात दुखापत झाली होती. कॅच घेताना त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली, त्यानंतर त्याला स्कॅनसाठी पाठवण्यात आले आणि अखेरीस तो या स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नसल्याचे समोर आले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :आयपीएल २०२३गुजरात टायटन्सकेन विल्यमसन
Open in App