David Miller Killer Catch, IPL 2022 RR vs GT Video: गुजरात टायटन्स (Gujarat Titans) च्या संघाने राजस्थानचा ३७ धावांनी पराभव केला. गुजरातने राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) च्या गोलंदाजांची तुफान धुलाई करत २० षटकात १९२ धावा कुटल्या. कर्णधार हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) नाबाद ८७ धावांची खेळी आणि त्याला अभिनव मनोहर (Abhinav Manohar), डेव्हिड मिलरची मिळालेली साथ याच्या जोरावर गुजरातने राजस्थानला १९३ धावांचे मोठे आव्हान दिले. राजस्थानच्या डावात पहिली विकेट गेल्यावर अश्विनला (Ashwin) तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्यात आले. त्याची चांगलीच चर्चा झाली. पण त्यापेक्षा जास्त चर्चा मिलरने (David Miller) घेतलेल्या अश्विनच्या कॅचची रंगली.
मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना देवदत्त पडीकल शून्यावर बाद झाला. त्यानंतर जोस बटलर आणि आर अश्विनने दमदार भागीदारी केली. तिसऱ्या क्रमांकावर अश्विनला फलंदाजी देण्याचा निर्णय खूपच आश्चर्याचा होता. त्याने बटलरला फटकेबाजीसाठी स्ट्राईक दिली. पण फर्ग्युसनने त्याला बाद केले. अश्विनला पॉवर प्ले च्या शेवटच्या षटकात धावा करण्याचा मोह आवरला नाही. त्याने बॅटवर मिळालेला चेंडू वेगाने टोलवला. पण मिलरने त्यापेक्षाही अप्रतिम झेप घेत कॅच घेतला. पाहा व्हिडीओ-
त्याआधी, दरम्यान, प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या गुजरातच्या सलामीवीरांना फारशी चमक दाखवता आली नाही. मॅथ्यू वेड १२ धावांवर रन आऊट झाला. विजय शंकर २ धावा काढून तर शुबमन गिल १३ धावा काढून झेलबाद झाला. पण त्यानंतर हार्दिक पांड्या आणि अभिनव मनोहर जोडीने गुजरातचा डाव सावरत ८६ धावांची भागीदारी केली. अभिनव मनोहरने ४३, हार्दिकने नाबाद ८७ तर डेव्हिड मिलरने नाबाद ३१ धावा केल्या.
Web Title: David Miller takes Killer Catch to dismiss Ashwin watch video IPL 2022 RR vs GT Live Updates
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.