David Miller, Unsold to Match Winner : दक्षिण आफ्रिकेचा स्टार खेळाडू डेव्हिड मिलरने IPL 2022 Playoffs मध्ये वादळी खेळी करत गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाला फायनलचे तिकीट मिळवून दिले. डेव्हिड मिलरने क्वालिफायर-१ सामन्यात धडाकेबाज अर्धशतक झळकावले. त्याच्या नाबाद खेळीच्या जोरावरच गुजरातने राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) ७ गडी राखून पराभव केला. या विजयासह गुजरात टायटन्सने त्यांच्या पहिल्याच हंगामात अंतिम फेरीत प्रवेश केला. मॅचचा हिरो ठरलेल्या डेव्हिड मिलरने ३८ चेंडूत ६८ धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली. यामुळेच मिलरला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. पण मिलरबद्दल एक महत्वाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे का...
मेगालिलावाच्या पहिल्या फेरीत मिलर होता UNSOLD
मोठी गोष्ट म्हणजे यावेळी मेगा लिलावात डेव्हिड मिलर पहिल्या फेरीत Unsold म्हणजे विकला गेला नव्हता. दुसऱ्या फेरीत पुन्हा त्याचं नाव आल्यावर मिलरला १ कोटींची मूळ किंमत होती. त्यावेळी मात्र त्याला खरेदी करण्याची स्पर्धा लागली. ही स्पर्धा फक्त राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स या दोन संघांमध्येच होती. राजस्थानने पहिली बोली लावली. त्यानंतर तब्बल १६व्या बोलीला गुजरातने मिलरला ३ कोटी रुपयांना विकत घेतले.
दरम्यान, क्वालिफायर-१ सामन्यात राजस्थानविरुद्ध मिलरची सुरुवात संथ होती. पहिल्या १४ चेंडूत त्याने केवळ १० धावा केल्या. कारण गुजरात संघाने ८५ धावांत तीन विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर हार्दिक पांड्या आणि डेव्हिड मिलरने धावा जमवायला सुरूवात केली. १४ चेंडूनंतर मिलरने पुढच्या २४ चेंडूत ५८ धावा केल्या. या दरम्यान मिलरने ५ षटकार ठोकले. त्यात शेवटच्या तीन चेंडूवरील तीन षटकारांचा समावेश होता.
Web Title: David Miller went unsold in first round if IPL 2022 Mega Auction Later on purchased by Gujarat Titans fighting to Rajasthan Royals
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.