David Warner News: सध्या ऑस्ट्रेलियन संघ वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे, पण यादरम्यान क्रिकेट ऑस्ट्रेलियामध्ये एक मोठा वाद निर्माण झाला आहे. बॉल टेम्परिंग प्रकरणानंतर डेव्हिड वॉर्नरने यापूर्वी कर्णधारपदावरील बंदी उठवण्यासाठी अर्ज केला होता, पण नंतर तो मागे घेतला. डेव्हिड वॉर्नरने एका मोठ्या निवेदनातून बोर्डावर अनेक आरोप केले होते, पण आता गोष्टी आणखी किचकट होताना दिसत आहेत.
अधिकाऱ्यांनी बॉल टेम्परिंग करण्यास सांगितलेडेव्हिड वॉर्नरचा मॅनेजर जेम्स एरस्काइन याने एका मुलाखतीत अनेक मोठे खुलासे केले आहेत. 2016 मध्ये झालेले कसोटी सामने जिंकण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या दोन अधिकाऱ्यांनीच खेळाडूंना चेंडूशी छेडछाड(बॉल टेम्परिंग) करण्यास सांगितले होते, असा खुलासा जेम्स एरस्काइनने केला आहे. जेम्सच्या या खुलाशानंतर क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे.
संबंधित बातमी- क्रिकेटपेक्षा माझ्यासाठी कुटूंब महत्त्वाचे आहे! डेव्हिड वॉर्नरने मिळणाऱ्या कर्णधारपदाला मारली लाथ, केले गंभीर आरोप
अनेक धक्कादायक खुलासे केलेजेम्स एरस्काइनने एका मुलाखतीत या विषयावर सविस्तरपणे भाष्य केले. 2018 च्या सँडपेपर गेट वादाबाबत जेम्स म्हणाले की, 'जर सत्य बाहेर आले तर अनेक बड्या खेळाडूंची नावे समोर येतील. तेव्हा सगळे म्हणतील की डेव्हिड वॉर्नरला अशा प्रकारे का गोवण्यात आले. जेम्स म्हणतात की सत्य नक्कीच बाहेर येईल. तेव्हाही काही क्रिकेटपटू म्हणाले होते की, आम्ही सर्व काही सांगतो, पण कोणीही धाडस करू शकले नाही.'
त्या काळात वॉर्नरने मूल गमावलेजेम्सने पुढे सांगितले की, '2016 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ऑस्ट्रेलियन संघ 85 धावांवर ऑलआऊट झाला आणि सामना एका डावाने हरला. या सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाचे दोन अधिकारी ड्रेसिंग रूममध्ये आले आणि त्यांनी संघाला बॉलचे टेम्परिंग करून रिव्हर्स स्विंग करण्याचा सल्ला दिला. हा संपूर्ण बॉल टॅम्परिंगचा वाद सुरू होता, त्यावेळी डेव्हिड वॉर्नरचे कुटुंब खूप त्रस्त होते. डेव्हिड वॉर्नरची पत्नी कँडिस हिनेही या काळात एक मूलही गमावले, हा कुटुंबासाठी मोठा धक्का होता.'