मेलबर्न - अॅशस मालिकेतील बॉक्सिंग डे कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने भारतीय कर्णधार विराट कोहलीचा विक्रम मोडीत काढला आहे. नो बॉलवर मिळालेल्या जीवदानाचा फायदा घेत वॉर्नरनं दमदार शतक ठोकले आहे. मेलबर्नमध्ये सुरू असलेल्या अॅशेस मालिकेतील चौथ्या कसोटीत वॉर्नरने 21 वे शतक झळकावले आहे आणि याबाबतीत भारताचा कर्णधार विराट कोहलीला पछाडले आहे. विराटच्या नावावर कसोटीमध्ये सध्या 20 शतकांची नोंद आहे.
वॉर्नर 99 धावांवर असताना इंग्लंडकडून पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या टॉम कुरेनच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. मात्र इंग्लंडचा हा आनंद जास्त वेळ टिकला नाही. टीव्ही रिप्लेमध्ये कुरनेचा पाय क्रिजबाहेर असल्याचे दिसले आणि मैदानावरी पंचांनी तो नो बॉल ठरवला. त्यानंतर वॉर्नरने पुढच्या चेंडूवर एक धाव घेत शतक साजरे केले. या खेळी दरम्यान वॉर्नरने 70 व्या कसोटीमध्ये 6 हजार धावा पूर्ण केल्या. वॉर्नरने 151 चेंडूंचा सामना करताना 13 चौकार आणि 1 षटकारासह 103 धावा केल्या.
बॉक्सिंग डे टेस्टमध्ये पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 89 षटकांमध्ये 3 बाद 244 धावा केल्या आहेत. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ 65 आणि शॉन मार्श 31 धावांवर नाबाद होते. इंग्लंडकडून जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड आणि क्रिस वोक्सने प्रत्येकी 1 बळी घेतला.
Web Title: David Warner broke the record of Virat Kohli
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.