Join us  

शंभराव्या कसोटीत डेव्हिड वॉर्नरने पाडला विक्रमांचा पाऊस, आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई करत नोंदवले हे विक्रम

David Warner Records: ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने मेलबर्नमध्ये सुरू असलेल्या बॉक्सिंग डे कसोटीमध्ये विक्रमांचा पाऊस पाडला आहे. शंभरावा कसोटी सामना खेळणाऱ्या डेव्हिड वॉर्नरने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी द्विशतकी खेळी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 2:08 PM

Open in App

मेलबर्न -  ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने मेलबर्नमध्ये सुरू असलेल्या बॉक्सिंग डे कसोटीमध्ये विक्रमांचा पाऊस पाडला आहे. शंभरावा कसोटी सामना खेळणाऱ्या डेव्हिड वॉर्नरने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी द्विशतकी खेळी केली. वॉर्नरने २५४ चेंडूत २०० धावा कुटल्या. यादरम्यान, त्याने १६ चौकार आणि २ षटकार ठोकले.

१००व्या कसोटीत डेव्हिड वॉर्नरने केलेली ही द्विशतकी खेळी सर्वार्थाने ऐतिहासिक ठरली. १०० व्या कसोटीत द्विशतकी खेळी करणारा डेव्हिड वॉर्नर हा ऑस्ट्रेलियाचा पहिला आणि जागतिक क्रिकेटमधील दुसरा खेळाडू ठरला आहे. डेव्हिड वॉर्नरने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची तुफानी धुलाई करत २५४ चेंडूत २०० धावा कुटल्या. मात्र डेव्हिड वॉर्नर २०० धावांवर रिटायर्ड हर्ट झाल्याने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी सुटकेचा निश्वास टाकला. मात्र तिसऱ्या दिवशी डेव्हिड वॉर्नर पुन्हा एकदा फलंदाजीसाठी उतरू शकतो.

मेलबर्न कसोटीच्या दुसऱ्या दिवशी फलंदाजीला सुरुवात केल्यावर डेव्हिड वॉर्नरने स्टिव्हन स्मिथच्या साथीने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई केली. वॉर्नरने शेवटचं शतक जानेवारी २०२१ मध्ये फटकावलं होतं. त्यानंतर आज त्याने शतकांचा दुष्कार संपवताना द्विशतकी खेळी केली. याबरोबरच वॉर्नरने सचिन तेंडुलकरच्या मोठ्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून सर्वाधिक शतके फटकावण्याच्या सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी त्याने बरोबरी साधली आहे. सचिनने सलामीवीर म्हणून ४५ शतके ठोकली होती. तर वॉर्नरने आज फटकावलेले शतक सलामीवीर म्हणून त्याचे ४५ वे शतक आहे.  

आजच्या सामन्यात वॉर्नरने रचलेले विक्रम पुढीलप्रमाणे - १०० व्या कसोटीमध्ये द्विशतक- बॉक्सिंग डे कसोटीमध्ये द्विशतक- एमसीजीवर द्विशतक- १०० व्या कसोटीत २०० धावा फकटावणारा ऑस्ट्रेलियाचा पहिला फलंदाज- १०० व्या कसोटीत द्विशतक फटकावणारा जागतिक क्रिकेटमधील दुसरा फलंदाज- कसोटी क्रिकेटमध्ये त्यांचं तिसरं द्विशतक  

टॅग्स :डेव्हिड वॉर्नरआॅस्ट्रेलियाआंतरराष्ट्रीय क्रिकेट
Open in App