David Warner World record in Test History, Ashes 2023 ENG vs AUS: ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरने एशेस कसोटी मालिका 2023 च्या पाचव्या सामन्यातील दुसऱ्या डावात संघासाठी महत्त्वपूर्ण अर्धशतक झळकावले. त्यानंतर तो बाद झाला. वॉर्नरने दुसऱ्या डावात 106 चेंडूंचा सामना करत 9 चौकारांच्या मदतीने 60 धावा केल्या आणि अशेस कसोटी मालिकेतील हे त्याचे दुसरे अर्धशतक ठरले. या सामन्यात वॉर्नरने त्याचा सलामीचा जोडीदार उस्मान ख्वाजासोबत पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली आणि त्याची विकेट पडली तेव्हा संघाची धावसंख्या १४० धावा होती. ख्वाजासोबतच्या या शतकी भागीदारीच्या जोरावर त्याने कसोटी क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम केला.
डेव्हिड वॉर्नरने अशेस 2023 मध्ये खेळल्या गेलेल्या 5 सामन्यांच्या 10 डावांमध्ये 31.44 च्या सरासरीने 283 धावा केल्या आणि या दरम्यान त्याच्या बॅटमधून दोन अर्धशतकेही झळकली. या मोसमातील त्याची सर्वोत्तम धावसंख्या ६६ धावा होती. या मोसमात त्याने 35 चौकार आणि एक षटकारही मारला. वॉर्नरने जॅक हॉब्सचा विक्रम मोडीत काढला. कसोटी क्रिकेटमध्ये सलामीला सर्वाधिक वेळा 100 धावांची भागीदारी करणाऱ्यांच्या यादीत वॉर्नर अव्वल ठरला. डेव्हिड वॉर्नरने कसोटी क्रिकेटमध्ये 25 व्यांदा 100 धावांची सलामी भागीदारी केली. त्याने जॅक हॉब्स, ग्रॅम स्मिथ आणि अलिस्टर कुक यांना मागे टाकले. या तिघांनीही २४ वेळा असा पराक्रम केला होता.
टेस्ट मध्ये सर्वाधिक वेळा 100 धावांची सलामी
- 25 – डेव्हिड वार्नर
- 24 – जॅक हॉब्स
- 24 – ग्रॅम स्मिथ
- 24 – अलिस्टर कूक
- 23 – मायकल आथर्टन
- 23 – वीरेंद्र सेहवाग
डेव्हिड वॉर्नरने मोडला बॉयकॉटचा विक्रम
डेव्हिड वॉर्नरने आठव्यांदा अशेसमध्ये 100 धावांची ओपनिंग पार्टनरशिप करत जेफ्री बॉयकॉटचा विक्रम मोडीत काढला. जेफ्री बॉयकॉटने अशेसमध्ये 7 वेळा असे केले होते. अशेसमध्ये सर्वाधिक 100 धावांची सलामी भागीदारी करणारा फलंदाज जॅक हॉब्स आहे. त्याने 16 वेळा असे केले आहे.
Web Title: David Warner creates world record scoring most 100 runs opening partnership in Ashes 2023 England vs Australia
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.