नवी दिल्ली : सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-20 विश्वचषकाचा थरार रंगला आहे. भारत-पाकिस्तानच्या सामन्यासाठी मेलबर्नच्या मैदानावर चाहत्यांनी विक्रमी संख्येने हजेरी लावली होती. भारतीय संघाने सलामीचे दोन्हीही सामने जिंकून उपांत्यफेरीकडे कूच केली आहे. तर पाकिस्तानला आपल्या दोन्हीही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. यजमान ऑस्ट्रेलियाच संघ एका विजयासह ग्रुप ए मध्ये चौथ्या क्रमांकावर स्थित आहे. तसेच कांगारूच्या संघाला आपल्या मायदेशातच चाहत्यांचा पाठिंबा मिळत नसल्याचे पाहायला मिळत आहे मात्र भारताच्या सामन्यांना तुडुंब गर्दी होत आहे.
दरम्यान, आज या स्पर्धेत यजमान ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सामना होणार होता. मात्र पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला. दोन्हीही संघानी 1-1 विजय मिळवून इथपर्यंत मजल मारली आहे. आजचा सामना रद्द झाल्यामुळे दोन्हीही संघाना प्रत्येकी 1-1 गुण मिळाला आहे. ऑस्ट्रेलियाला पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला परंतु कांगारूच्या संघाने दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेला धूळ चारून विजय मिळवला. इंग्लंडने पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव करून विजयी सलामी दिली मात्र आयर्लंडविरूद्धच्या सामन्यात पावसामुळे पराभव स्वीकारावा लागला.
भारताच्या सामन्याला तुडुंब गर्दीखरं तर भारत विरूद्ध नेदरलॅंड्सच्या सामन्याच्या दिवशी सुट्टी नसताना देखील मैदानात 36,426 एवढ्या प्रेक्षकांची उपस्थिती होती. तर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात वीकेंडला झालेल्या सामन्याला केवळ 34,756 प्रेक्षकांची नोंद झाली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला मायदेशातूनच चाहत्यांचा पाठिंबा मिळत नसल्याचे दिसत आहे. अशातच ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने यावरून चाहत्यांना एक आवाहन केले आहे.
ऑस्ट्रेलियाकडे चाहत्यांनी फिरवली पाठ"Cmon ऑसी! मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर आज रात्री इंग्लंड विरूद्ध ऑस्ट्रेलिया हा सामना पाहायला या आणि आपल्या खेळाडूंना सपोर्ट करा. #T20WorldCup". वॉर्नरने चाहत्यांना सामना पाहण्यासाठी मैदानावर येण्याचे आवाहन केले होते. खरं तर पावसामुळे आजचा सामना रद्द झाला मात्र हा सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन्ही संघासाठी 'करा किंवा मरा' असा होता. कारण पराभूत होणाऱ्या संघाचे विश्वचषकातील आव्हान जवळपास संपुष्टात आले असते. मात्र आता दोन्हीही संघाचे गुण समान आहेत.
भारतीय संघ अव्वल स्थानी भारतीय संघाने चालू विश्वचषकातील सलामीचे दोन्हीही सामने जिंकून ग्रुप बीच्या क्रमवारीत पहिले स्थान पटकावले आहे. भारताचे सध्या 4 गुण आहेत, उपांत्यफेरी गाठण्यासाठी किमान 6 गुणांची आवश्यकता आहे. भारताला साखळी फेरीतील आणखी 3 सामने खेळायचे आहेत. ग्रुप बीच्या क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेचा संघ 3 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. तर पाकिस्तान आणि नेदरलॅंड्स यांचे अद्याप खातेही उघडले नाही.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"