David Warner IPL 2022, SRH vs DC Live Updates : डेव्हिड वॉर्नर SRHने केलेला अपमान नाही विसरला; Rovman Powell सोबत गोलंदाजांना धु धु धुतला, वर्ल्ड रिकॉर्ड नोंदवला!

IPL 2022, Sunrisers Hyderabad vs  Delhi Capitals Live Updates : ८ वर्षांनंतर प्रथमच सनरायझर्स हैदराबादविरुद्ध मैदानावर उतरलेल्या डेव्हिड वॉर्नरने ( David Warner) झालेल्या अपमानाची सव्याज परतफेड केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 09:21 PM2022-05-05T21:21:33+5:302022-05-05T21:28:44+5:30

whatsapp join usJoin us
David Warner IPL 2022, SRH vs DC Live Updates: Delhi Capitals post 207/3 (Warner 92*, Powell 67*) in 20 overs against Sunrisers Hyderabad, Warner world record | David Warner IPL 2022, SRH vs DC Live Updates : डेव्हिड वॉर्नर SRHने केलेला अपमान नाही विसरला; Rovman Powell सोबत गोलंदाजांना धु धु धुतला, वर्ल्ड रिकॉर्ड नोंदवला!

David Warner IPL 2022, SRH vs DC Live Updates : डेव्हिड वॉर्नर SRHने केलेला अपमान नाही विसरला; Rovman Powell सोबत गोलंदाजांना धु धु धुतला, वर्ल्ड रिकॉर्ड नोंदवला!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022, Sunrisers Hyderabad vs  Delhi Capitals Live Updates : ८ वर्षांनंतर प्रथमच सनरायझर्स हैदराबादविरुद्ध मैदानावर उतरलेल्या डेव्हिड वॉर्नरने ( David Warner) झालेल्या अपमानाची सव्याज परतफेड केली. मागील पर्वात हैदराबादने वॉर्नरकडून कर्णधारपद काढून घेतले, त्याला अंतिम ११मधून बाहेर केले आणि ऑक्शनपूर्वी रिटेनही नाही केले. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या वॉर्नरने आज त्या सर्व अपमानाचा राग आपल्या खेळीतून काढला. दिल्लीचा डाव सावरताना त्याने खणखणीत अर्धशतक झळकावताना विश्वविक्रमाची नोंद केली आणि संघाला मजबूत धावसंख्या उभारूनही दिली. रोव्हमन पॉवेलनेही ( Rovman Powell) त्याच्यासोबत हैदराबादच्या गोलंदाजांना बदडले... वॉर्नर व पॉवेल या जोडीनं ६३ चेंडूंत शतकी भागीदारी केली.


प्रथम गोलंदाजीला आलेल्या सनरायझर्स हैदराबादला भुवनेश्वर कुमारने चांगली सुरूवात करून दिली. भुवीने त्याच्या पहिल्या दोन षटकांत ११ चेंडू निर्धाव फेकले व १ धाव देत १ विकेट घेतली. सीन अ‍ॅबोटनेही चांगली गोलंदाजी केली अन् त्याच्या पहिल्याच षटकात वॉर्नरची कॅच सोडली. उम्रान मलिक व वॉर्नर यांच्यातला सामना पाहण्यासाठी सारेच उत्सुक होते. वॉर्नरने त्याच्या पहिल्याच षटकात २१ धावा चोपल्या. पाचव्या षटकात अ‍ॅबोटने संथ चेंडू टाकून मिचेल मार्शला ( १०)  झेल देण्यास भाग पाडले. रिषभ पंत व वॉर्नर यांनी २९ चेंडूंत ४८ धावांची भागीदारी करून दिल्लीची गाडी रुळावर आणली. श्रेयस गोपाळने टाकलेल्या ९व्या षटकात वॉर्नरने पहिल्या चेंडूवर एक धाव काढून रिषभला स्ट्राईक दिल्यानंतर रिषभने पुढील चार चेंडूंवर ६, ६, ६, ४ अशी बरसात केली. पण, ६व्या चेंडूवर रिषभ चूकला व बॅटची कड घेत चेंडू यष्टिंवर आदळला. रिषभला १६ चेंडूंत १ चौकार व ३ षटकारांसह २६ धावांवर माघारी जावं लागलं. 


त्यानंतर वॉर्नरने चौकार खेचून अर्धशतक पूर्ण केले. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ४०० षटकाराचा विक्रमही वॉर्नरने या सामन्यात नोंदवला. आयपीएल २०२२मधील वॉर्नरचे हे चौथे अर्धशतक ठरले, तर ट्वेंटी-२० क्रिकेटमधील ८९वे... ट्वेंटी-२०त सर्वाधिक अर्धशतक झळकावण्याचा विश्वविक्रम वॉर्नरच्या नावावर नोंदवला गेला आहे. त्याने ख्रिस गेलचा ( Chris Gayle)  ८८ अर्धशतकांचा विक्रम मोडला. विराट कोहली ७६ अर्धशतकांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. रोव्हमन पॉवेल १८ धावांवर असताना केन विलियम्सनकडून त्याचा झेल सुटला.

वॉर्नर व पॉवेल या जोडीनं हैदराबादच्या गोलंदाजांना धु धु धुतला... १७व्या षटकात सीन अ‍ॅबोटच्या गोलंदाजीवर पॉवेलने दोन उत्तुंग षटकार खेचले. ६३ चेंडूंत या दोघांनी शतकी भागीदारी पूर्ण केली. पॉवेलने ३० चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. २०वे षटक पॉवेलनेच खेळून काढल्याने वॉर्नरचे शतक होऊ शकले नाही. वॉर्नर ५८ चेंडूंत १२ चौकार व ३ षटकारांसह ९२ धावांवर नाबाद राहिला. पॉवेलने ३५ चेंडूंत ३ चौकार व ६ षटकारांसह नाबाद ६७ धावा केल्या. दिल्लीच्या ३ बाद २०७ धावा झाल्या. या दोघांनी ६६ चेंडूंत १२२ धावांची भागीदारी केली. 

सनरायझर्स हैदराबादसाठी डेव्हिड वॉर्नरचे योगदान!
२०१४मध्ये सनरायझर्स हैदराबादने वॉर्नरला करारबद्ध केले. त्यानंतर २०१५, २०१७ व २०१९ साली या संघाकडून वॉर्नरने ऑरेंज कॅप जिंकली आणि २०१६मध्ये हैदराबादला मिळालेलं एकमेव जेतेपद हे वॉर्नरच्याच नेतृत्वाखाली आहे.  तरीही मागील दोन पर्वात अपयश आल्यामुळे फ्रँचायझीने वॉर्नरला अपमानास्पद वागणूक दिली. त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेतलेच, शिवाय त्याला अंतिम ११मधूनही बाहेर केले. हैदराबादसाठी वॉर्नरने ९५ सामन्यांत ४९.५५च्या सरासरीने ४०१४ धावा केल्या आहेत. त्यात ४० अर्धशतकं व २ शतकांचा समावेश आहे. 
 

Web Title: David Warner IPL 2022, SRH vs DC Live Updates: Delhi Capitals post 207/3 (Warner 92*, Powell 67*) in 20 overs against Sunrisers Hyderabad, Warner world record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.