WTC फायनलपूर्वी डेव्हिड वॉर्नरची मोठी घोषणा; कसोटी क्रिकेटमधून 'या' दिवशी होणार निवृत्त 

david warner retirement : ७ जूनपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याला सुरूवात होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2023 03:50 PM2023-06-03T15:50:02+5:302023-06-03T15:50:22+5:30

whatsapp join usJoin us
David Warner set to retire from Test cricket after the SCG Test against Pakistan in January 2024  |  WTC फायनलपूर्वी डेव्हिड वॉर्नरची मोठी घोषणा; कसोटी क्रिकेटमधून 'या' दिवशी होणार निवृत्त 

 WTC फायनलपूर्वी डेव्हिड वॉर्नरची मोठी घोषणा; कसोटी क्रिकेटमधून 'या' दिवशी होणार निवृत्त 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : ७ जूनपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (ICC World Test Championship against) अंतिम सामन्याला सुरूवात होत आहे. दोन्हीही संघातील खेळाडू या बहुचर्चित सामन्याच्या सरावात व्यग्र आहेत. अशातच ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने एक मोठी घोषणा केली आहे. या वर्षाच्या अखेरीस भारतात होणारा वन डे विश्वचषक वॉर्नर खेळणार आहे. पण ३६ वर्षीय खेळाडूने जानेवारी २०२४ मध्ये पाकिस्तानविरुद्ध सिडनी येथे घरच्या मैदानावर होणारा कसोटी सामना खेळल्यानंतर निवृत्त होणार असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानविरूद्धचा कसोटी सामना आपला शेवटचा सामना असेल असंही त्यानं सांगितलं.

"मला धावा करायच्या आहेत. मी नेहमीच सांगितलंय की, २०२४ चा ट्वेंटी-२० विश्वचषक हा माझा अंतिम सामना असेल. मी निश्चितपणे सांगतो की, मी जर आगामी विश्वचषकात धावा केल्या तर मी ऑस्ट्रेलियात खेळणे सुरू ठेवले तरी, मी वेस्ट इंडिजविरूद्धची मालिका खेळणार नाही", असं डेव्हिड वॉर्नरनं शनिवारी सांगितलं.

पाकिस्तानविरूद्ध शेवटची 'कसोटी'
दरम्यान, वॉर्नर सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना खेळणार आहे. हा सामना जानेवारी २०२४ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. तसेच २०२४ चा विश्वचषक माझ्यासाठी शेवटचा असेल असंही वॉर्नरनं नमूद केलं. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा अंतिम सामना ७ ते ११ जून या दरम्यान, लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे.
 
WTC साठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, इशान किशन, के.एस. भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट. 

राखीव खेळाडू - यशस्वी जैस्वाल, मुकेश कुमार, सूर्यकुमार यादव.  

WTC साठी ऑस्ट्रेलियन संघ - 
पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलंड, अॅलेक्स कॅरी, कॅमरून ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवुड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लायन, मिच मार्श, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर.

Web Title: David Warner set to retire from Test cricket after the SCG Test against Pakistan in January 2024 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.