David Warner DRS Controversy, IPL 2022 DC vs RCB Video: तुफान फॉर्ममध्ये असलेल्या दिनेश कार्तिकच्या ६६ धावांची खेळी आणि ग्लेन मॅक्सवेलचे दमदार अर्धशतक याच्या जोरावर बंगलोरने २० षटकात १८९ धावां केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीच्या डावाची सुरूवात चांगली झाली. डेव्हिड वॉर्नरने दमदार फटकेबाजी करत अर्धशतकी खेळी केली. मात्र त्याच्या विकेटवरून पुन्हा एकदा DRS चा मुद्दा चर्चेत आला.
१९० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पृथ्वी शॉ १६ धावांवर माघारी परतला. त्यानंतर डेव्हिड वॉर्नरने फटकेबाजी सुरू करत अर्धशतक ठोकले. पण पहिल्या विकेटनंतर मैदानात आलेल्या मिचेल मार्शला फटके मारायला जमत नसल्याने दिल्लीला आवश्यक धावगती मिळत नव्हती. अशा वेळी स्पिनर हसरंगाच्या षटकात डेव्हिड वॉर्नरने स्विच हिट मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू त्याच्या पायाला लागला पण अंपारने त्याला नाबाद ठरवले. RCB ने जेव्हा DRS ची मदत घेतली त्यावेळी मात्र तो बाद असल्याचे दाखवण्यात आले.
नक्की वाद काय?
खरे पाहता चेंडू ज्या रेषेत जात होता, त्या रेषेत चेंडू बाहेरच्या दिशेला जाणे अपेक्षित होते. पण तसे न होता, DRS मध्ये चेंडू सरळ रेषेत येताना दाखवल्याने बॉल ट्रँकिंगमध्ये चेंडू स्टंपवर लागल्याचे दिसले आणि वॉर्नरला बाद ठरवण्यात आले. वॉर्नरच्या या विकेटवरून समालोचकांमध्येही चर्चा रंगल्याचे दिसले. पण पंचांनी निर्णय दिल्यामुळे त्याबाबत काहीही बोलता येऊ शकत नाही, असे त्यांचे एकमत झाले.
Web Title: David Warner Wicket DRS Controversy Video IPL 2022 DC vs RCB on Wanindu Hasaranga Live Updates
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.