डेव्हिड वॉर्नरच्या पत्नीला कसोटी सामन्यादरम्यान लोकांनी घेरलं, मुलींसमोर केली आक्षेपार्ह टिप्पणी; नेमकं काय घडलं?

कसोटी सामन्यावेळी आपल्याला काही लोकांनी घेरलं आणि आपल्या मुलीसमोरच घृणास्पद गोष्टी बोलल्या गेल्या, असा आरोप कँडिस हिनं केला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 06:23 PM2022-12-12T18:23:51+5:302022-12-12T18:24:16+5:30

whatsapp join usJoin us
david warner wife candice warner face vile abuse in the adelaide oval test match aus vs wi | डेव्हिड वॉर्नरच्या पत्नीला कसोटी सामन्यादरम्यान लोकांनी घेरलं, मुलींसमोर केली आक्षेपार्ह टिप्पणी; नेमकं काय घडलं?

डेव्हिड वॉर्नरच्या पत्नीला कसोटी सामन्यादरम्यान लोकांनी घेरलं, मुलींसमोर केली आक्षेपार्ह टिप्पणी; नेमकं काय घडलं?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नरची पत्नी कँडिस हिनं वेस्ट इंडिजविरुद्ध अ‍ॅडलेड ओव्हल मैदानावर नुकत्याच झालेल्या कसोटी सामन्यादरम्यान तिच्यासोबत घडलेल्या भयंकर प्रसंगाची माहिती दिली आहे. कसोटी सामन्यावेळी आपल्याला काही लोकांनी घेरलं आणि आपल्या मुलीसमोरच घृणास्पद गोष्टी बोलल्या गेल्या, असा आरोप कँडिस हिनं केला आहे. 

डेव्हिड वॉर्नरची पत्नी कँडिस आपल्या मुलींसोबत अ‍ॅडलेड ओव्हलवर खेळवला गेलेला कसोटी सामना पाहण्यासाठी उपस्थित होती. तेव्हा काही लोकांनी तिला लक्ष्य केलं आणि अश्लील कमेंट्स केल्या. 'ट्रिपल मिस समर ब्रेकफास्ट' नावाच्या शोमध्ये कॅंडिसने याचा खुलासा केला आहे.

“अ‍ॅडलेड ओव्हल येथे शनिवारी दुपारी जेवणाच्या विश्रांतीपूर्वी माझ्या मुलींना त्यांच्या वडिलांना भेटायचं होतं. म्हणून आम्ही अ‍ॅडलेड ओव्हलच्या एका भागातून दुसऱ्या दुसऱ्या बाजूला जात होतो. ते सुमारे २०० मीटर अंतरावर असेल. त्यावेळी माझ्यासोबत माझ्या तीनपैकी दोन मुली होत्या. आम्ही लोकांच्या गर्दीतून वाट काढत जात होतो. त्यावेळी पाच-सहा लोकांचा एक समूह होता, त्यांनी माझ्याबद्दल काही घृणास्पद गोष्टी बोलल्या", असं कँडिस हिनं सांगितलं. 

ते माझ्यावर हसत होते - कॅंडिस
वॉर्नरच्या पत्नीने सांगितले की ते लोक तिच्यावर हसत होते आणि तिने त्या लोकांना उत्तर देण्याचं तिनं ठरवलं.  “मी चालत राहिले. सुरुवातीला दुर्लक्ष केलं. पण मग मी थांबलो आणि मी त्या लोकांकडे पाहिलं. त्यातला एक खूप बोलत होता. तो माझ्याकडे बघून हसत होता. कदाचित तो विचार करत होता की आपण जे करतोय ते बरोबर आहे. म्हणून मी त्याला सामोरं जायचं ठरवले. खरंतर मला उत्तर द्यायची गरज नव्हती पण मी माझ्या मुलींसोबत होते आणि अशा परिस्थितीत मला त्यांचा सामना करणं आवश्यक वाटलं. कारण मी माझ्या कृतीतूनच माझ्या मुलांना शिकवू शकते", असं कँडिस म्हणाली. 

वॉर्नरने कुटुंबासाठी घेतला निर्णय
क्रिकेट ऑस्ट्रेलियानं लादलेल्या आजीवन कर्णधाराच्या बंदीविरुद्ध अपील करण्याचा आपला निर्णय कुटुंबीयांच्या सल्ल्यानुसारच मागे घेतला होता, असं नुकतंच डेव्हिड वॉर्नरनं सांगितलं होतं. "गेला आठवडा माझ्यासाठी आणि कुटुंबीयांसाठी खूप कठीण होता. वेदनादायी होता. कर्णधारपदावरील बंदी उठवण्याची अपील मागे घेण्याचा निर्णय घेतला", असं वॉर्नर म्हणाला. तसंच आपल्या कुटुंबाला प्राधान्य आणि कल्याण लक्षात घेत निर्णय घेतल्याचं वॉर्नरनं सांगितलं. वॉर्नर आता १७ डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या मालिकेत खेळताना दिसणार आहे.

Web Title: david warner wife candice warner face vile abuse in the adelaide oval test match aus vs wi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.