वर्ल्ड कप जिंकला आता भारताविरुद्ध ट्वेंटी-२० मालिकेत नाही खेळायचं; स्टार खेळाडूची माघार

ऑस्ट्रेलियाने वन डे वर्ल्ड कप उंचावला आणि आता ते भारताविरुद्ध ५ ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी सज्ज झाले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 12:06 PM2023-11-21T12:06:32+5:302023-11-21T12:07:23+5:30

whatsapp join usJoin us
David Warner Withdraws From India T20I Series After Winning ODI World Cup | वर्ल्ड कप जिंकला आता भारताविरुद्ध ट्वेंटी-२० मालिकेत नाही खेळायचं; स्टार खेळाडूची माघार

वर्ल्ड कप जिंकला आता भारताविरुद्ध ट्वेंटी-२० मालिकेत नाही खेळायचं; स्टार खेळाडूची माघार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ऑस्ट्रेलियाने वन डे वर्ल्ड कप उंचावला आणि आता ते भारताविरुद्ध ५ ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी सज्ज झाले आहेत. वर्ल्ड कप संघातील ८ खेळाडूंची ट्वेंटी-२० मालिकेसाठी निवड करण्यात आली होती, परंतु त्यातल्या एका स्टार खेळाडूने माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाने मंगळवारी जाहीर केले की त्यांचा स्फोटक सलामीवीर डेव्हिड वॉर्नर ( David Warner)  भारताविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत खेळणार नाही. वर्ल्ड कपमध्ये वॉर्नरची कामगिरी उत्कृष्ट होती. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २३ नोव्हेंबरपासून मालिका सुरू होत आहे आणि पहिला सामना विशाखापट्टणम येथे होणार आहे.

डिसेंबरपासून पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेतून वॉर्नरचे पुनरागमन होणार आहे. वॉर्नरने वर्ल्ड कपमध्ये ५३५ धावा केल्या. मॅथ्यू वेडच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघ ट्वेंटी-२० मालिकेत भारताला टक्कर देणार आहे. वॉर्नरच्या जागी आता युवा खेळाडू अॅरोन हार्डीचा समावेश केला गेला आहे.  क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निवेदनात म्हटले की, वॉर्नरला मायदेशात परत बोलावण्याचा निवडकर्त्यांचा निर्णय होता. वॉर्नरने आधीच संकेत दिले आहेत की तो त्याच्या कसोटी कारकिर्दीला अलविदा करणार आहे. मात्र असे असूनही तो पांढऱ्या चेंडूच्या फॉरमॅटवर लक्ष केंद्रित करत आहे. 


वॉर्नरने आधीच सांगितले आहे की तो २०२४-२५ मध्ये क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा करार घेणार नाही आणि पुढील वर्षी होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी तो संघासाठी उपलब्ध असेल. याशिवाय त्याला २०२५ मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही भाग घ्यायचा आहे   

ट्वेंटी-२० मालिकेसाठी दोन्ही संघ
भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, मुकेश कुमार


ऑस्ट्रेलिया : मॅथ्यू वेड (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मॅट शॉर्ट, मार्कस स्टॉयनिस, टिम डेव्हिड, जोश इंग्लिस, जेसन बेहरेनडॉर्फ, सीन अॅबॉट, नॅथन एलिस, स्पेन्सर जॉन्सन, अॅडम झाम्पा, तन्वीर संघा, अॅरोन हार्डी

मालिकेचे वेळापत्रक ( Schedule ) 
पहिली ट्वेंटी-२० - २३ नोव्हेंबर, विशाखापट्टणम
दुसरी ट्वेंटी-२० - २६ नोव्हेंबर, तिरुअनंतपूरम
तिसरी ट्वेंटी-२० - २८ नोव्हेंबर, गुवाहाटी
चौथी ट्वेंटी-२० - १ डिसेंबर, नागपूर
पाचवी ट्वेंटी-२० ३ डिसेंबर, हैदराबाद 
 

 

Web Title: David Warner Withdraws From India T20I Series After Winning ODI World Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.