बंगळुरु - बंगळुरुत सुरु असलेल्या चौथ्या वन-डे सामन्यात डेव्हिड वॉर्नरनं धडाकेबाज शतक झळकावलं आहे. वॉर्नरचा हा 100 वा आंतरराष्ट्रीय वन-डे सामना असल्यामुळे त्याच्यासाठी हे शतक खास आहे. या सामन्यात फलंदाजीसाठी उतरल्यानंतर 100 वा सामना खेळणारा तो ऑस्ट्रेलियचा 28 खेळाडू ठरला. सध्या सुरु असलेल्या मालिकेतील दुसरा सामना ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव स्मिथचा 100 सामना होता. ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक वन-डे सामने खेळण्याचा विक्रम रिकी पॉटिंगच्या नावावर आहे. पॉटिंगनं 374 सामने खेळले आहेत.
बंगळुरुत सुरु असलेल्या चौथ्या वन-डेत वॉर्नरनं 103चेंडूचा सामना करताना आपलं शतक पूर्ण केलं. या खेळीदरम्यान त्यानं 10 चौकार आणि 3 षटकार लगावले. ऑस्ट्रेलियानं या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार स्मिथचा हा निर्णय फिंच आणि वॉर्नरनं धमाकेदार फलंदाजी करत योग्य ठरवला. दोघांनी द्विशतकी भागिदारी केली. सध्या फिंच 85 चेंडूत 84 धावा काढून वॉर्नला साथ देत आहे.
वॉर्नरच्या 100 वनडे सामन्यावर नजर टाकल्यास त्याची सुरुवातीच्या 50 सामन्यातील कामगिरी निराशजन दिसून येते. पहिल्या 50 वन-डेत 31.40 च्या सरासरीनं 1,539 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्यानं दोन शतक केली आहेत. त्यानंतरच्या 50 सामन्यात वॉर्नरनं तुफानी फलंदाजी करताना 58.04 च्या सरासरीनं 2654 धावा केल्या. यादरम्यान त्यानं 12 शतक ठोकले. 100 वन-डे सामन्यात 44.08 च्या सरासरीनं 4200 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्यानं 14 शतक केली आहेत.
भारतात सुरु असलेल्या पहिल्या तीन सामन्यात वॉर्नरला आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. पहिल्या तीन सामन्यात त्यानं अनुक्रमे 25,1 आणि 42 धावा केल्या होत्या.