चित्तगाव : सलामीवीर डेव्हिड वॉर्नरच्या शतकी खेळीच्या बळावर आॅस्ट्रेलियाने बांगलादेशविरुद्ध पावसाचा व्यत्यय आलेल्या दुस-या कसोटी सामन्यात आज तिस-या दिवशी महत्त्वपूर्ण आघाडी मिळवली आहे.
आॅस्ट्रेलियाने तिसºया दिवसअखेर पहिल्या डावात ९ बाद ३७७ धावा केल्या असून, त्यांनी ७२ धावांची आघाडी घेतली आहे. बांगलादेशने त्यांच्या पहिल्या डावात ३0५ धावा केल्या होत्या. वॉर्नरने २0९ चेंडूंत त्याचे शतक पूर्ण केले. हे त्याचे कसोटी क्रिकेटमधील सर्वात संथ शतक ठरले. इतर फलंदाज धावांसाठी संघर्ष करीत असताना त्याने केलेली खेळी मात्र सुरेख होती. त्याने २३४ चेंडूंचा सामना करतान ७ चौकारांसह १२३ धावा केल्या. त्याने पीटर हँडसकॉम्ब (८२) याच्या साथीने तिसºया गड्यासाठी १५२ धावांची भागीदारी केली. कर्णधार स्टीव्हन स्मिथ (५८) यानेदेखील अर्धशतक ठोकले, तर ग्लेन मॅक्सवेलने ३८ धावांचे योगदान दिले.
पावसामुळे आजचा सकाळचा खेळ होऊ शकला. खेळ सुरू झाल्यानंतर वॉर्नरने त्याचे शतक पूर्ण केले. आज आपला २२ वा जन्मदिवस साजरा करणाºया वेगवान गोलंदाज मुस्ताफिजूर रहमान आणि फिरकी गोलंदाज मेहदी हसन यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. बांगलादेशने पहिली कसोटी जिंकताना दोन सामन्यांच्या मालिकेत १-0 अशी आघाडी घेतलेली आहे.
संक्षिप्त धावफलक
बांगलादेश : पहिला डाव ३0५.
आॅस्ट्रेलिया : पहिला डाव ९ बाद ३७७. (डेव्हिड वॉर्नर १२३, पीटर हँडसकॉम्ब ८२, स्टीव्हन स्मिथ ५८, ग्लेन मॅक्सवेल ३८. मुस्ताफिजूर रहमान ३/८४, मेहदी हसन ३/९३)
Web Title: David Warner's century, Australia's 72-run lead
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.