Join us  

डेव्हिड वॉर्नरची आंतरराष्ट्रीय कारकीर्द समाप्त! ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कपमधून बाहेर 

सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याची १५ वर्षांची देदीप्यमान आंतरराष्ट्रीय कारकिर्द समाप्त झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 7:15 AM

Open in App

किंग्सटाऊन : अफगाणिस्तानने मंगळवारी टी-२० विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशला नमवल्यानंतर ऑस्ट्रेलियाचेही या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. यासह ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याची १५ वर्षांची देदीप्यमान आंतरराष्ट्रीय कारकिर्दही समाप्त झाली. ऑस्ट्रेलिया सुपर आठ गटात दोन गुणांसह तिसऱ्या स्थानी राहिला. त्यांना अफगाणिस्तानविरुद्धच्या धक्कादायक पराभवानंतर भारताविरुद्धही पराभव पत्करावा लागला होता.

जानेवारी २००९ मध्ये टी-२० सामन्याद्वारे वॉर्नरने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. त्याने आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना गेल्या सोमवारी भारताविरुद्ध खेळला. दखल घेण्याची बाब म्हणजे क्रिकेटविश्वात आपले वेगळे स्थान निर्माण केलेल्या या दिग्गज सलामीवीराला गार्ड ऑफ ऑनरची संधी मिळाली नाही, तसेच प्रेक्षकांनी उभे राहून त्याला अभिवादनही केले नाही. आपल्या अखेरच्या सामन्यात वॉर्नर केवळ ६ धावा करून बाद झाला.

वॉर्नरची कारकीर्द

  1. कसोटी - सामने : ११२, सरासरी: ४४.५९ धावा : ८७८६, शतक/अर्धशतक : २६/३७.
  2. एकदिवसीय - सामने : १६१, सरासरी: ४५.३०. धावा : ६९३२, शतक/अर्धशतक : २२/३३.
  3. टी-२० - सामने : ११०, सरासरी: ३३.४३, धावा : ३,२७७, शतक/अर्धशतक : १/२८.
टॅग्स :डेव्हिड वॉर्नरआंतरराष्ट्रीय क्रिकेटआॅस्ट्रेलिया