Join us  

११ दिवसांचा कसोटी सामना, १९८१ धावा, ६ शतकं अन् विजयासाठी ४२ धावांची गरज असताना खेळाडू ट्रेन पकडून परतले 

Timeless Test ended 11 days टाईमलेस टेस्ट ( Timeless Test ) असंच काहीसं नाव डरबन येथे खेळलेल्या गेलेल्या कसोटीला दिले गेले

By स्वदेश घाणेकर | Published: March 03, 2021 11:07 AM

Open in App
ठळक मुद्देविजयासाठी इंग्लंडच्या संघासमोर ६९६ धावांचे मोठे लक्ष्यइंग्लंडच्या फलंदाजांची चिवट खेळी पण ५ बाद ६५४ धावांवर सोडला डाव अन् पकडली ट्रेन

टाईमलेस टेस्ट ( Timeless Test ) असंच काहीसं नाव डरबन येथे खेळलेल्या गेलेल्या कसोटीला दिले गेले... दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड ( South Africa vs England) यांच्यातला हा कसोटी सामना ११ दिवस चालला. दोन्ही संघांनी मिळून १९८१ धावा चोपल्या आणि त्यात एकूण ६ शतकांची नोंद झाली. पण, विजयासाठी ४२ धावांची गरज असताना आणि हाताशी पाच विकेट असताना इंग्लंडच्या संघानं सामना सोडला. इंग्लंडचे खेळाडू आपापल्या सामानाची बांधाबांध करून ट्रेन पकडण्यासाठी निघून गेले आणि ही ऐतिहासिक कसोटी ड्रॉ राहिली. नेमकं या सामन्यात असं झालं तरी काय? ८२ वर्षांपूर्वी १९३९मध्ये ३ मार्चलाच या कसोटीची सुरुवात झाली. ( Timeless Test ended 11 days)  'पौछा मारू या झाडू?'; Jasprit Bumrahच्या लग्नाच्या चर्चांवर युवराज सिंगनं केलं ट्रोल

यजमान दक्षिण आफ्रिकेनं प्रथम फलंदाजी करताना ५३० धावा केल्या. पीटर व्हॅन डेर बिज्ल यांनी १२५, डुडली नर्स १०३ धावा कुटल्या आणि कर्णधार अॅलेन मेलव्हीलेनं ७८ धावा केल्या. याशिवाय यष्टिरक्षक-फलंदाज रॉनी ग्रीव्हेसननं ७५ धावांचं आणि एरिक डाल्टननं ५७ धावांचं योगदान दिलं. इंग्लंडच्या रेग पर्क्सनं पाच विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा पहिला डाव ३१६ धावांवर गडगडला. त्यांच्याकडून यष्टिरक्षक-फलंदाज लेस एमेसनं सर्वाधिक ८४ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या एरिक डाल्टन चार, तर चूड लांगटन तीन विकेट्स घेतल्या.  Jasprit Bumrah getting married : जसप्रीत बुमराहची 'लाईफ पार्टनर' कोण?; या अभिनेत्रीचं नाव चर्चेत

पहिल्या डावात आघाडी घेणाऱ्या दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या डावात ४८१ धावा केल्या आणि इंग्लंडसमोर विजयासाठी ६९६ धावांचे लक्ष्य ठेवले. दुसऱ्या डावात आफ्रिकेच्या अॅलन मेलव्हीलेनं १०३ धावा केल्या. पीटर व्हॅननं ९७ आणि ब्रूसम मिचेलनं ८९ धावा केल्या. केन विल्जोननं ७४ धावा केल्या इंग्लंडसाठी केन फारनेसनं ४ विकेट्स घेतल्या. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक लक्ष्याचा पाठलाग होण्याची शक्यता फार कमीच होती. पण, इंग्लंडच्या फलंदाजांनी दमदार खेळ केला. Dale Steyn : डेल स्टेनसाठी IPLचे दरवाजे कायमचे बंद?; पाकिस्तान सुपर लीगचे कौतुक करताना केलं धक्कादायक विधान

इंग्लंडच्या पॉल गिब ( १२०) आणि कर्णधार वॅली हॅमोंड ( १४०) यांनी शतकी खेळी केली, तर बिल एडरिचनं २१९ धावांची दमदार खेळी केली. लिओनार्ड हट्टन ( ५५) व एडीए पैंटर ( ७५) यांनी अर्धशतकी खेळी केली.  इंग्लंडनं ५ बाद ६५४ धावा केल्या आणि त्यांना विजयासाठी अवघ्या ४२ धावांची गरज होती. खेळपट्टीवर लेस एमेस ( १७) व ब्रायन व्हेलेंटाइन ( ४) खेळत होते. इंग्लंडचा संघ कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास घडवेल असेच सर्वांना वाटले होते, परंतु इंग्लंडच्या खेळाडूंनी आपापल्या सामानाची आवाराआवर करण्यास सुरूवात केली. खेळाडूंनी सामना अर्धवट सोडला.IND vs ENG : ऑस्ट्रेलियाचा चौथ्या कसोटीत इंग्लंडला पाठिंबा, अ‍ॅशेसमधील शत्रू टीम इंडियाविरुद्ध एकवटले; जाणून घ्या कारण

जाणून घ्या कारणइंग्लंडच्या संघाला समुद्रामार्गे मायदेशात परतायचे होते आणि त्यांच्या जहाजाच्या निघण्याची वेळ झाली होती. जहाज केपटाऊन येथे उभं होतं आणि डरबन ते केपटाऊन असा दोन दिवसांचा प्रवास खेळाडूंना ट्रेननं करायचा होता. त्यामुळे कसोटी क्रिकेटमधील टाइमलेस कसोटीचा शेवट असा झाला. 

टॅग्स :इंग्लंडद. आफ्रिकाआयसीसी